तीन दिवसांत एकापाठोपाठ दोन बिबट्यांचा मृत्यु ; चौकशीची वन्यप्रेमी जनतेची मागणी
किनवट : तालुक्यातील तल्लारी - झळकवाडी जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू शेळके यांच्याच शेतात एकापाठोपाठ तीन दिवसाच्या फरकाने दोन बिबट्यांचा मृतदेह आढळल्याने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली.
शनिवारी (दि.१८) ही घटना उघडकीस आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व किनवट वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्यांचा मृतदेह ताब्यात घेतला . पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले त्यानंतर त्या बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला .
तल्लारी व झळकवाडी(ता.किनवट) जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू शेळके यांच्या शेतात एकापाठोपाठ दोन बिबट्यांचा मृतदेह आढळून आल्याने नांदेड वन विभागामध्ये व किनवट वन विकास महामंडळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे . या पैकी एका बिबट्याचा मृतदेह बुधवारी (दि.१५) मिळून आला होता . किनवट वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा व शवविच्छेदन करून त्याचा अंत्यविधी केला होता.या घटनेला दोन दिवस उलटले नाहीत तर आज (दि.१८) दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह त्याच शेतकऱ्यांच्या शेतात प्रथम मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या ठिकाणा पासून पन्नास फूट अंतरावर बिबट्याच्या मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन या गंभीर घटनेची माहिती नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांना दिली .अशा या गंभीर घटनेची दखल घेत नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मृत अवस्थेत असलेल्या बिबट्याची प्रत्यक्ष पाहणी केली .सदर बिबट्याचा पंचनामा करून पशुधन विकास अधिकारी व्ही.एल. बिराजदार, अजय शिवणकर, ओम प्रकाश शिंदे, एस. एन. मिराशे यांनी यावेळी त्या बिबट्याचे शवविच्छेदन करून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले . एकापाठोपाठ दोन बिबट्याचा मृतदेह आढळल्याने त्याच्यावर विषप्रयोग केला की काय अशी शंका वर्तवली जात असताना गावातील लोकांना विश्वासात घेऊन याचा तपास करा, असा सल्ला नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक अशिष ठाकरे यांनी यावेळी वनविकास महामंडळाचे उपविभागीय व्यवस्थापक एस. एच. व्यास व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिला.
असे असेल तरीही किनवट वन विकास महामंडळाच्या जंगलात कमठाला व सिरमेटी शिवारात ही मागे दोन-तीन महिन्याखाली दोन बिबटे मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही.वन विकास महामंडळाच्या ताब्यातील जंगलात सतत होणाऱ्या या हिंस्र प्राण्यांच्या मृत्यूचे कारणांचा तपास लागत नाही. त्यामुळे या भागात हिंस्र प्राण्यांना मारणारी शिकाऱ्यांची टोळी सक्रिय आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे .त्यामुळे शासनाने तात्काळ या गंभीर गोष्टीकडे लक्ष देण्याची परिसरातील वन प्रेमी नागरिक करत आहेत .
Saturday 18 April 2020
तीन दिवसांत एकापाठोपाठ दोन बिबट्यांचा मृत्यु ; चौकशीची वन्यप्रेमी जनतेची मागणी
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment