कोरोना संक्रमनाच्या पाश्र्वभूमीवर "नसोसवायएफ" तर्फे विद्यार्थी हिताच्या विविध मागण्या ; शिक्षणमंत्र्यांचे वेधले लक्ष - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 April 2020

कोरोना संक्रमनाच्या पाश्र्वभूमीवर "नसोसवायएफ" तर्फे विद्यार्थी हिताच्या विविध मागण्या ; शिक्षणमंत्र्यांचे वेधले लक्ष

कोरोना संक्रमनाच्या पाश्र्वभूमीवर "नसोसवायएफ" तर्फे विद्यार्थी हिताच्या विविध मागण्या ; शिक्षणमंत्र्यांचे वेधले लक्ष


 नांदेड   : कोरोना (कोविड-१९) चे संक्रमणा पासून विद्यार्थ्याचा बचाव करण्यासाठी राज्यातील विविध विद्यापीठ परिक्षा पध्दती मध्ये तात्पूरत्या कालावधीसाठी बदल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याकडे "नसोसोवाय", या विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. हर्षवर्धन दवणे यांनी नुकतीच केली आहे.
 निवेदनात नमुद केले आहे की, कोरोना (कोविड-१९)चे संक्रमण जगभरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.मागच्या ३० दिवसा पासून राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालय बंद आहे. हा कालावधी परिक्षेचा आसून येत्या जून मध्ये नविन शैक्षणिक वर्षाची सुरवात होनार आहे.विद्यार्थी समुहिक परिक्षा देण्यास भित आहे कारण कोरोना संक्रमण. तसेच शिक्षकाचीही   हीच स्थिति आहे.
  तंज्ञाच्या मता नूसार संक्रमणाचा कालावधी हा अंदाजे सहा महिण्याचा आसू शकक्तो. तसेच विद्यापिठाच्या परिक्षा व  जून महिण्यात  निकाल जाहिर होणे गरजेचे असून जेने करुन पुढील शैक्षणिक वर्षात व शिक्षणात बाधा निर्माण होणार नाही. या साठी   पुढील प्रकारे तात्पुरत्या कालावधी साठी परिक्षा पध्दती मध्ये बदलाव करण्यात यावा व निकाल जाहिर करावा.
   निवेदनात काही मागण्याही करण्यात आलेल्या आहेत,त्या अशा;
१) तात्पुरत्या कालावधी साठी निर्धारीत परिक्षा पध्दतीत बदलाव करण्यात यावा.
२) व्हाँटस् अप,संकेतीक स्थल( वेब साइट) द्वारा  असायमेन्ट व टिटौरियल चे प्रशन विद्यार्थ्याना  सूचित करण्यात यावे.
३) ५० गुणाची मैखिक परिक्षा घेण्यात यावी.
४) मैखिक परिक्षा घेत असताना विद्यार्थ्याना सामाजिक अंतर,तोंडाला मास,व सानेटायझर चा वाफर करण्यात यावा.
५) मैखिक परिक्षा घेत असताना प्रत्येक विद्यार्थाना तिन दिवस आधी फोन संदेशा द्वारे वेळापत्रक  कळवण्यात यावे.
६) मौखिक परिक्षा घेत आसताना विद्यार्थी व परिक्षका मध्ये समाजीक अंतर ,तसेच विद्यार्थ्याचा जमाव होणार नाही या साठी कडक नियम तयार करन्यात यावे.
      निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, महा.राज्य,कुलगुरु, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages