रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी मोजावे लागतात पैसे ;तालुका आरोग्य अधिका-यांचे आरोग्य सेवेकडे होतेय दुर्लक्ष - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 April 2020

रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी मोजावे लागतात पैसे ;तालुका आरोग्य अधिका-यांचे आरोग्य सेवेकडे होतेय दुर्लक्ष

रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी मोजावे लागतात पैसे ;तालुका आरोग्य अधिका-यांचे आरोग्य सेवेकडे होतेय दुर्लक्ष


 किनवट :  रोग्यांना पुढील उपचारासाठी इत्तर रुग्णालयात जायचे असेल तर बोधडी (बु.ता.किनवट)  येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका मोफत मिळत नसून रोग्यांनी इंधनाचे पैसे मोजावे लागतात. मोफत रुग्णवाहिका दिल्याची बतावणी करुन डाॅ.पवार यांनी इंधन घोटाळा घडविल्याचे प्रकरण नव्यानेच चव्हाट्यावर आले आहे. आदिवासी बहूल तालुक्यातील तळागाळातील रोग्यांना मोफत रुग्णवाहिका मिळत नसेल तर असून अडचण आणि नसून खोळंबा म्हणावा लागेल, या गंभीर प्रकरणाची विनाविलंब चौकशी करुन कार्यवाही करणे काळाची गरज असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे नुकतीच केली आहे.
         बोधडी बु.प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्याना कोणत्या कारणांनी वादाच्या चक्रव्युवहात गुरफटतच चालले आहे. भल्याभल्या नेत्यांच्या वास्तव्याचे हे गाव असले तरी, या आरोग्य केंद्राचा मागासलेपणा कांही दूर झालेला दिसत नाही. या दुर्लक्षिततेचा परिपाक म्हणून रोग्यांच्या खिशाला कात्री लाऊन प्रशासनातील अशी सेवा देणारे डाॅक्टर्स मात्र मालामाल होतांना दिसतात, हे या तक्रारीवरुन स्पष्ट करण्यास मदत होतांना दिसते. या आरोग्य केंद्रात प्रसुती, अपघात किंवा तत्सम गंभीर आजारावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी किनवट, आदिलाबाद, नांदेड सारख्या ठिकाणच्या रुग्णालयाकडे जायचे झाल्यास रुग्णवाहिका घेऊन जावी लागते. सदर रुग्णवाहिकेच्या इंधनाचा व्यवहार हा डाॅ.पवार यांच्या हाती असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणने आहे. गंभीर अवस्थेतील रोग्यांसाठी रुग्णवाहिकेची मागणी केल्यास इंधन भरुन घेऊन जाण्याच्या अटीशर्थीवर दिल्या जाते. त्या इंधनाच्या पावत्या आरोग्य केंद्रातील लेखा विभागाचा कार्यभार सांभाळणारे डाॅ.पवार लाॅगबूकच्या रेकार्ड डायरीला जोडतात. वरिष्ठ प्रशासनाकडे ती बिलं सादर करुन देयक मिळवत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. हा प्रकार मागिल दोन वर्षापासून चालु असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
        या संबंधीचा प्रकार जाणून घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.संजय मुरमुरे यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले की, प्रसुतीचा रुग्ण असेल, अपघातग्रस्त रुग्ण असेल, गंभीर रोगी असेल, ज्यांना पुढील उपचारासाठी इतरत्र पाठवले जाते, तशांना रुग्णवाहिकेची मोफत सेवा निश्चीतच मिळते. डाॅ.मुरमुरेंच्या या स्पष्टीकरणांमुळे आणि तक्रारकर्त्यांची तक्रार पहाता प्रकरण गंभीर असून, त्यातील सत्यता समोर येण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी होणे काळाची गरज आहे. बोधडीतीलच एका डायलिशीसच्या रुग्णास नांदेडकडे तातडीने घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहीकेची मागणी केल्यास आडीच हजार रुपये इंधनाची सबब पुढे करुन मागणी केली. त्यावर रोग्याच्या संबंधितांनी सहाय्यक जिल्हाधिकारी गोयल व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मुरमुरे यांच्यांकडे दाद मागितली होती. त्याच मुद्यावरुन त्यांनी कान उघडणी केली तरी, त्यांच्या कार्यशैलीत फारसा बदल जाणवत नसल्याने त्याचा मार लोकांना सहन करावा लागत असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणने आहे.

No comments:

Post a Comment

Pages