आपल्याकडे आलेल्या नातेवाईकांची कोरोना तपासणी करून घ्या ; उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 April 2020

आपल्याकडे आलेल्या नातेवाईकांची कोरोना तपासणी करून घ्या ; उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे आवाहन

आपल्याकडे आलेल्या नातेवाईकांची कोरोना तपासणी करून घ्या ; उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे आवाहन

 किनवट : नांदेड जिल्हा हा कोरोना विषाणू च्या संसर्गापासून  मुक्त आहे.नागरिकांनी दक्षता घेऊन तो तसाच ठेवावा, असे आव्हान किनवट उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.
    किनवट तालुक्यातील नागरिक यांचे नातेवाईक विविध कारणासाठी रेड झोन व येलो झोन च्या गावामध्ये राहत आहेत. केंद्र शासन व राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देश प्रमाणे अशा लोकांनी त्या त्या गावातच राहणे अपेक्षित आहे.
     किनवट तालुक्यातील नागरिकांचे अन्य गावी रहात असलेले  नातेवाईक हे मायेपोटी, जिव्हाळ्या पोटी व अन्य कारणांसाठी कोणतीही परवानगी  न घेता  शासन यंत्रणांना चुकवून आपल्या नातेवाईकांना कोरोना संसर्गाचा धोका पत्करून किनवट तालुक्यात घेऊन येत आहेत.
  अशा परत आलेल्या नागरिकांची नावे सुजाण नागरिक म्हणून आपण नजीक च्या वैद्यकीय केंद्रात द्यावीत. तसेच त्यांना कोरोना तपासणी साठी जवळच्या कोरोना तपासणी केंद्रात घेऊन जावे. (यात बाहेरगावी असणारा व त्यास घेऊन येणारा दोघांची पण तपासणी आवश्यक आहे)
परंतु, असे होत नाही. अशा प्रत्येकाची सुजाण नागरिकांनी माहिती द्यावी व स्वतःच्या व आपल्या तालुक्याच्या निरोगीपणासाठी त्यांची तपासणी करवून घ्यावी,असे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages