किराणा व्यापा-यांकडून नागरिकांची लुट ; वैजनाथ करपुडे यांचा आरोप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 April 2020

किराणा व्यापा-यांकडून नागरिकांची लुट ; वैजनाथ करपुडे यांचा आरोप

किराणा व्यापा-यांकडून नागरिकांची लुट ; वैजनाथ करपुडे यांचा आरोप




 किनवट   :    लॉकडाऊन च्या काळात शहरातील किराणा व्यापारी हे नागरीकांची लुट करत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नियमांनुसार साहित्याचे दर दुकानातील दर्शनी भागात लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस चे विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील यांनी केली आहे.
      लॉकडाउन च्या परिस्थितीत जिवानावश्यक बाब म्हणुन शहरातील व परिसरातील किराणा दुकान चालु आहेत. परंतु, आजच्या परिस्थितीत समाजातील विविध स्तरातील नागरीक हे मोठ्या प्रमाणात गरजु व्यक्तींना दान करुन आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याकरता धीर देत आहे. तर, शहरातील व परिसरातील काही लालची दुकानदार हे या कोरोना विषाणुच्या परिस्थितीला एका संधीच्या स्वरुपात पाहत आहेत. जिवनावश्यक असलेल्या किराणा दुकानातील साहित्या हे चढ्या भावाने विकत आहेत. यात ते गरीब व गरजवंत नागरीकाची देखिल तमा न बाळगता सर्रास लुट करत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने शासनाच्या विविध नियामांचे व कायद्याचे अनुपालन करण्याविषयी अशा दुकानदारांना ताकीत द्यावी व त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करावी. जेणे करुन या बिकट परिस्थितीमध्ये नागरीकांची लुट होणार नाही. अन्न भेसळ विभागाने देखिल अशा आस्थापनांना भेटी देऊन साहित्यांचा दर्जा तपासावा जेणे करुन नागरीकांचे आरोग्य देखिल अबाधित राहिल अन्यथा नागरीक विनाकारन अशा दुकानदारांच्या लालचीचे बळी पडणार आहेत.

No comments:

Post a Comment

Pages