नांदेड,दि.१८ : "सेक्युलर आर्ट मुव्हमेंट",डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आॅनलाईन कला चर्चा आयोजित करीत आहे.
विषय आहे,"सेक्युलर आर्ट मुव्हमेंट",ची भूमिका दोन भागात मांडणी करणार आहेत जेष्ठ साहित्यिक,विचारवंत व सेक्युलर मुव्हमेंट चे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे. पहीला भाग शनिवारी(दि.१८) सायंकाळी साडे पाच वाजता तर,दुसरा भाग रविवारी (दि.१९) सायंकाळी साडेपाच वाजता.
पहील्या भागात आपल्यासोबत आज संवाद साधणार आहेत,प्रा. गौतमीपुत्र कांबळे. बौद्धिक मांडणी व मासेस मधल्या चळवळीचा तगडा अनुभव असलेले व्यक्तिमत्व म्हणून प्रा.कांबळे यांची ओळख आहे.
कला व राजकारण, कला व समाज, कला व सामान्य माणूस, कला व कलेच्या विविध शक्यता अशा विविधांगी विषयांना स्पर्श करत सेक्युलर आर्ट मुव्हमेंट ची भूमिकेची , ऐतिहासिक, राजकीय व सांस्कृतिक तसेच तत्वज्ञानात्मक मांडणी ते करतील.
सदरची मांडणी ही दोन भागात होणार आहे. भाग १ हा आज (दि.१८) सायंकाळी साडे पाच वाजता लाईव होईल व भाग २ उद्या (दि.१९) सायंकाळी साडे पाच वाजता ठरलेल्या वेळेनुसार होईल.
लाईव अटेंड करा, चर्चा ऐका, प्रश्न विचारा व जाणून घ्या काय आहे कलेचे हे अंग.
No comments:
Post a Comment