नागपूर :गेल्या दोन महिन्यापासून भारतात कोरोना विषाणूने मोठया प्रमाणात हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचा परिणाम आपण आज भोगत आहोत. संपूर्ण भारत आज एका अर्थाने अनिश्चित काळासाठी बंद आहे, जनजीवन ठप्प झाले आहे. लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे, अगोदरच अर्थव्यवस्था बिकट असणाऱ्या आणि बेरोजगारांची संख्या जास्त असण्याऱ्या देशात सरकारी, निम्न सरकारी आणि खाजगी उद्योगधंदे, कारखाने बंद झाले आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. नियोजनाभावी एका रात्रीत झालेल्या 'बंद'च्या घोषणेमुळे लोकांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जाव लागलें. मोठ्या शहरांपासून ते छोट्याश्या खेड्यापर्यंत लोकांना आणिबाणीसदृश्य परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे. आधीच सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था जातीय, वर्गीय, धार्मिक, लिंग आणि वर्ण आधारित असताना या कोरोनाच्या नवीन संकटामुळे दलित, आदिवासी, स्त्री, अल्पसंख्याक समूहाला उपासमार, सामाजिक आणि आर्थिक अवहेलना सहन करावी लागत आहे. हातावर पोट असणाऱ्या आणि रोजंदारीवर कुटुंबाची गुजराण करणाऱ्या व्यक्तींना हा कोरोना संकटामुळे रोज मरणाशी झुंज द्यावी लागत आहे.घरात खायला अन्नच नाहीअश्या परिस्थिती काही संस्था संघटनांनीत्यांची भूक भगविण्याचं काम हाती घेतल आहे .
खूप लढलो बेकीने आता लढूय एकीने ,सम्राट अशोक बहुद्देशीय संस्था , समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमी ,भीम सरकार ग्रुप ,तथागत बहुउद्देशीय संस्था ,सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्था,सयुक्त नागरी जयंती समारोह समिती ,धम्मसंदेश टीम ,क्रांतिसुर्य ग्रुप ,युथ फाॅर रिव्होलुशन ग्रुप ,रिपब्लिकन मुव्हमेंट सामाजिक संगठन ,सम्यक विद्यार्थी आंदोलन
अश्या अनेक संस्था संघटनांनी मजूर, श्रमिक कुटुंबांना धान्य किट पोहचऊन मदत केली आहे .हात मजुरी करणारा आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये दलित आदिवासीमोठया संख्यने आहेत .समता सैनिक दलाने 23 मार्च पासून रामबाग कम्युनिटी किचन च्या माध्यमातून फूड पॅकेट्स च्या वितरणाला सुरुवात केली आहे.त्या नंतर ही मदत शहरातील विविध झोपडपट्टयांमध्ये अविरत सुरू आहे.खूप लढलो बेकीने आता लढूय एकीने या अभियाना तर्फे 24 मार्च पासून मदतीचा उपक्रम आद्यापही सुरू आहे.सम्राट अशोक कॉलनी बुद्ध विहार समितीच्या कार्यकर्त्यांनी एक हजार फूड पॅकेट्सचा पुरवठा केला आहे.
सम्राट अशोक बहुद्देशीय संस्थे च्या वतीनेही ,रेल्वे स्टेशन , बसस्टँड परिसरातील निराधारांना24 मार्च पासून दोन वेळचे फूड पॅकेट्स तसेच धान्याचे किट्स वाटप करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment