किनवट : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड १९ (कोरोना) वैश्विक महामारी च्या संकट काळात शक्य ती मदत करावी, असे जनतेला केलेल्या आवाहनानुसार आधारस्तंभ सेवाभावी ट्रस्ट, टेंभी, तांडा (ता.किनवट) तर्फे पंतप्रधान केयर फंड मधे साडेतीन हजार रुपयांचा धनादेश तहसील कार्यालय, किनवट यांच्या कडे आज(दि.२२) सुपूर्द केला. यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी साडेपाच हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी कार्यालयायाकडे सुपूर्द केला आहे.
संस्थेचे अध्यक्ष शिवकांत राठोड व सचिव अंजु वसराम जाधव यांनी टेंभी तांडा या स्वत:च्या गावी कांही विधवा, गरीब, अपंग व गरजु लोकांनाही गहु, तांदूळ वाटप केले आहे.ते सामाजिक बांधिलकी जपत या संकट काळातही गरजुंना सहकार्य करण्याचे कार्य करीत आहेत.
No comments:
Post a Comment