नांदेडमध्ये आढळला कोरोना संक्रमित पहिला रुग्ण,पिरबु-हान नगरातील ६४ वर्षीय व्यक्ती पाॅझिटिव्ह - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 21 April 2020

नांदेडमध्ये आढळला कोरोना संक्रमित पहिला रुग्ण,पिरबु-हान नगरातील ६४ वर्षीय व्यक्ती पाॅझिटिव्ह

नांदेडमध्ये आढळला कोरोना संक्रमित पहिला रुग्ण,पिरबु-हान नगरातील ६४ वर्षीय व्यक्ती पाॅझिटिव्ह

       
नांदेडः महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली असतानाच आजपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहिलेल्या नांदेडमध्ये आज पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पिरबुऱ्हाणनगरमधील रहिवाशी असलेल्या या ६४ वर्षीय इसमावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या ६४ वर्षीय रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेऊन त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेड शहरातील हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पिरबुऱ्हाणनगर सील करण्यात आले आहे.

दरम्यान, आजपर्यंत मराठवाड्यातील संशयितांचे २८७४ नमुने घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी २५४५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. मराठवाड्यात ३,३५६ व्‍यक्‍तींना घरीच विलगीकरणात व ५८४ व्‍यक्‍तींना संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍यात आले आहे. तर १,२९२ व्‍यक्‍तींना अलगीकरण कक्षात  ठेवण्‍यात आले आहे. विशेष म्हणजे नांदेडमधील ९ संशयितांचे स्वॅबचे नमुने कालच तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी आज एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे कोरोना ग्रीन झोनमधील अस्तित्व धोक्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages