आमदार केराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात आंबेडकरांना अभिवादन करून भिमजयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 April 2020

आमदार केराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात आंबेडकरांना अभिवादन करून भिमजयंती साजरी

आमदार केराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात आंबेडकरांना अभिवादन करून भिमजयंती  साजरी


 किनवट  : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार भीमराव केराम यांचे   *लोकार्पन* या  जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
   कोवीड-19 च्या पार्श्वभुमिवर संपुर्ण देशात संचारबंदी आहे. त्या पार्श्वभुमिवर सोशल डिस्टेंसिंग ची मर्यादा राखत आमदार केराम यांच्या किनवट येथील *लोकार्पन* जनसंपर्क कार्यालयात स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांच्यासह कार्यालयीन कर्मचा-यांच्या उपस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी करण्यात आली.
  यावेळी आमदार केराम यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांच्यासह निळकंठ कातले, दत्तराम आडे, रामेश्वर गिनगुले, गजानन मस्तेवार, फजल चव्हाण, जावेद खान, नौशाद खान, संतोष मरसकोले यांच्यासह आ. केराम यांचे अंगरक्षक पो.कॉ. मदन गीते यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages