सिध्दार्थ नगर येथील रास्त भाव दुकानातून मोफत तांदळाचे वितरण सुरु
किनवट : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे तांदळाचे मोफत वाटप आजपासून (दि.१५)करण्यात येत आहे.
शहरातील सिध्दार्थ नगर येथील रास्त भाव दुकानात आजपासून (दि.१५) वाटपास सुरुवात झाली. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या कार्ड धारकांना सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी जनजागृती करण्यात आली व तांदूळ वाटपाची प्रक्रिया सुरु करण्यात आली.यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेमानीवार , नगरसेविका अनुसया यांचे प्रतिनिधी मधुकर अनेलवार,मिलिंद सर्पे,वाटप करणारे नासिर बशिर व लाभार्थी उपस्थित होते.
Thursday, 16 April 2020

सिध्दार्थ नगर येथील रास्त भाव दुकानातून मोफत तांदळाचे वितरण सुरु
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment