किनवट येथील कापूस व मका खरेदी केंद्र सुरू करावे -खासदार हेमंत पाटील ; माती परिक्षण केंद्राला मंजुरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 23 April 2020

किनवट येथील कापूस व मका खरेदी केंद्र सुरू करावे -खासदार हेमंत पाटील ; माती परिक्षण केंद्राला मंजुरी

नांदेड : किनवट व तामसा येथील कापूस, मका खरेदी केंद्र  तात्काळ  सुरू करावे  आणि किनवट येथे माती परीक्षण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार  हेमंत पाटील यांनी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीमध्ये केली असता किनवट  येथील माती परीक्षण केंद्राला बैठकीत तात्काळ मंजुरी देण्यात आली.  यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा अग्रणी बँकांनी ,पीकविमा कंपन्यानी शेतकऱ्यांना सहकार्य करावे.इसापूर धरणातून शेती व पिण्यासाठी दोन टप्यात पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडावे या मागण्या प्रकर्षाने मांडल्या.
      जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीला खासदार हेमंत पाटील,आ.बालाजी कल्याणकर ,आ.मोहन हंबर्डे, आ.राजेश पवार ,आ.श्यामसुंदर शिंदे,जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर नांदेड जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या सह आदी उपस्थित होते.कोरोना  विषाणू संसर्गाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया असणाऱ्या शेती घटकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,कोरोनामूळे देशात हाहाकार उडाला असला तरी येणारा खरिपाचा हंगाम महत्त्वाचा आहे असे खासदार  हेमंत पाटील म्हणाले त्यामुळे शेती व शेतकरी हिताच्या दृष्टीने आयोजन करण्यात यावे.म्हणून, किनवट,माहूर आणि हदगाव,हिमायतनगर च्या काही भागातील शेतकऱ्यांचे मागील हंगामातील  कापूस आणि मका हे पीक शासनाकडून खरेदी करण्यात आले नसून तो माल तसाच पडून आहे .रब्बी मधील गहू, हळद पिकाला कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध होत नाही त्यामुळे किमान मागच्या खरीपातील मका आणि कापसाच्या खरेदीसाठी हिंगोली मतदार संघातील किनवट येथे आणि हदगाव मधील तामसा येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, तर किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जात असल्याने त्याठिकाणी खरेदी केंद्र सुरू करावे, असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले यावेळी त्यांनी किनवट  येथे माती परीक्षण केंद्र स्थापन करावे, अशी मागणी करताच  या  बैठकीत माती परीक्षण केंद्राला तात्काळ मंजूरी देण्यात आली. तसेच जिल्हा अग्रणी बँकांनी  शेतकऱ्यांची अडवणूक करू नये,पीकविमा बाबत सुद्धा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.या बैठकीत आगामी खरीप हंगामात लागणारे बी-बियाणे, खत खरेदी व इतर उपाययोजना बाबत  चर्चा झाली.
     खासदार हेमंत पाटील यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देखील शेतकरी हित जोपासले आहे.लॉकडाऊन काळात शेत मालाला मुभा देण्यासाठी प्रशासनास मागणी केली होती, तर  वसमत येथे हळद खरेदी सूरु करून, इसापूर धरणाचे पाणी मे महिण्यात दोन टप्यात पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे, अशी  मागणी देखील केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages