नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विंष्णुपुरी नांदेड येथे covid-19 च्या तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे कोरोनाच्या संशयित रूग्णांचे 'स्वब' नमुने तपासणी साठी पुणे औरंगाबाद येथे जावे लागत होते पंरतु आपल्या विद्यापीठात हे सेंटर मंजूर झाल्यामुळे तात्काळ निदान होणार आहे जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ.रमेश पोखरियाल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे ही प्रयोगशाळा जिल्ह्याला मिळाली आहे ती तात्काळ सुरू होणार आहे.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे कोविड १९ च्या विषाणूंची टेस्ट करण्यासाठी लॅब तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला होता नांदेडसह राज्यात सहा ठिकाणी अशा लॅब उभारणीसाठी चा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता.
कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाचे स्वब नमुने तपासणी साठी पुणे, औरंगाबाद येथे पाठवावे लागत होते. त्यामुळे त्या संशयित रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळायला दोन दिवस लागतात. त्यामुळे त्यावर उपचारासाठी विलंब होतो. सध्याच्या परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करणे अंत्यत गरजेचे आहे.
नांदेडला एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून केलेल्या अथक परिश्रमावर पाणी फेरले अशा परिस्थितीत नांदेडला लॅब कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात चिंता दूर होणार आहे .विद्यापिठात कोविड १९ विषाणू संशोधन व निदान ( व्हीआरडीएल) प्रयोगशाळा मंजूर करण्यासाठी जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ.रमेश पोखरियाल, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नाला यश आले .केंद्र सरकारची परवानगी मिळाल्याचे विध्यापिठ प्रशासनाने सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी कुलगुरूंना हे तपासणी व निदान केंद्र तात्काळ सुरू करावेत, असे कळविले आहे संबंधित संस्थेतील उपलब्ध मनुष्यबळ वाढविण्यात यावी, असे निर्देशही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे कार्यरत अधिकारी यांनी यापूर्वीच दिले या लॅब मुळे आता कोविड१९ ची तपासणी सुलभ होणार आहे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या प्रयत्नांला यश मिळाले केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन, केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ.रमेश पोखरियाल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतापरावांनी आभार मानले.
Thursday 23 April 2020
Home
जिल्हा
नांदेडमध्ये कोविड १९ विषाणू तपासणी व निदान प्रयोगशाळा मंजूर ; खा चिखलीकर यांच्यापाठपुराव्याला यश
नांदेडमध्ये कोविड १९ विषाणू तपासणी व निदान प्रयोगशाळा मंजूर ; खा चिखलीकर यांच्यापाठपुराव्याला यश
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment