किनवट : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या (कै.) उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र,किनवट च्यावतीने सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल ,तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कार्य शिक्षण क्षेत्रकार्य गावातील गरीब कष्टकरी गरजवंतांना केंद्राच्या पुढाकाराने करोना च्या संकटात सरस्वती महाविद्यालया च्या वतीने दिलेल्या मदतीने दि. २१ रोजी धान्य व ईतर जीवनावश्यक वास्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मारोती थोरात ,प्राचार्य डॉ आनंद भंडारे केंद्र सह-समन्वयक डॉ. जी. बी. लांब यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांनी कोविड १९ आपत्ती काळात उपाय योजना करण्यासाठी विद्यपीठाच्या वतीने विवीध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. प्रशासनाला विविध प्रकारची मदत करण्यात येत आहे. अनेक महाविद्यालयांच्या वतीने विविध प्रकारची जनजागृती अभियान सुरू आहेत. मदत कार्य सुरू आहेत. किनवट येथील विद्यापीठाच्या कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रा चे समन्वयक डॉ. घन:शाम येळणे यांच्या मार्गदर्शनात समाजकार्य पदविका विभागाच्या विद्यार्थी व प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या वतीने लॉक डाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मजूर, विधवा, परित्यक्ता,अशा परिवारांचे सर्वेक्षण करून गरजवंत शोधले. प्रशासनाकडे दिले व एव्हढ्या वर न थांबता मदतीचे आवाहनही केले. नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, प्रा. रामप्रसाद तौर, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. अनुजा पाटील, प्रा. अंकुशराव सुरवसे,केंद्र सह-समन्वयक प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रा. विजय उपलेंचवार, प्रा. द्वारकप्रसाद वायाळ डॉ. सुनील व्यवहारे, प्रा. तपणकुमार मिश्रा, डॉ. रामकीशन चाटे, डॉ. मनोहर थोरात , प्रा अजय किटे, डॉ. किरण आयनेनिवार यांची मदत मिळवून ८७ परिवारांच्या शिधा वाटपाची व्यवस्था केली. कुठलीही गर्दी न होऊ देता वैशाली नगर येथे शिधावाटप करण्यात आले. या कामी आशिष उर्वते,गजानन परडे,शिवाजी सोळंके,सागर जाधव कर्मचारी राजू जाधव व जनार्धन काळे यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment