पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास मदतीसाठी नांदेडकरांनी दिला भरभरून प्रतिसाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 April 2020

पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास मदतीसाठी नांदेडकरांनी दिला भरभरून प्रतिसाद

पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास मदतीसाठी नांदेडकरांनी  दिला भरभरून प्रतिसाद



नांदेड : देणाऱ्याचे हात हजार या वाक्याला सार्थ ठरवले ते नांदेडचे प्रसिध्द उद्योजक प्रदीप चाडावार याच्या मदतीने, गरजू ,बेघर, रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाना 1 हजार अन्नधान्य मदत किट पालकमंत्री अशोक चव्हाण याच्यासह जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बेघर गरजू ,गोरगरीब जनतेला मदत म्हणून दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, अर्धा किलो मिरची मसालापावडर असे 1 हजार किट जिल्हा प्रशासनास 1 हजार व्यक्तीला किट वाटप करण्यासाठी नांदेडचे प्रसिद्ध उद्योजक आणि व्यावसायिक प्रदीप चाडावार यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे मदतीचे किट सुपूर्त केल्या. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी  डॉ .विपीन इटनकर उपस्थित होते.

 प्रदीप चाडावर हे मूळचे किनवटचे असून नांदेड येथे वास्तव्यास आहेत. लायन्स क्लब नांदेडचे ते सदस्य असून सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे योगदान  राहिले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आवाहनास प्रतिसाद देत त्यांनी एक हजार किट जिल्हा प्रशासनास वाटपासाठी सुपूर्द केल्या. ज्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही अशा गरजुना याचे वाटप करण्यात येणार आहेत. देणाऱ्याचे हात हजार, तसे हजार व्यक्तीला ही मदत पोहोचणार म्हणून हे वाक्य आज सार्थ ठरले आहे. नांदेडकरांनी नांदेडकरसाठी  केलेली मदत आणि प्रशासन व पालकमंत्री यांच्या समनव्यातुन कोरोनाच्या संकटा मधून लवकरच बाहेर पडतील असा विश्वास वाटतो.

No comments:

Post a Comment

Pages