वन विभागाच्या पथकाने केलेल्या दोन कारवाईत तस्करी होणारे सागवानी जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 27 April 2020

वन विभागाच्या पथकाने केलेल्या दोन कारवाईत तस्करी होणारे सागवानी जप्त


किनवट : वनपरिक्षेत्र नियतक्षेत्र  दिगडी (मंगाबोडी) मधील बेंदीतांडा (ता.किनवट) येथे विना नंबरचा काळ्या पिवळ्या रंगाचा एक आॅटो सागवान तयार फर्निचर सोफा व पलंग विना परवानगी अवैध वाहतूक करीत असताना वन विभागाच्या पथकाने पकडला.ही घटना रविवारी(दि.२६)रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
  साग कटसाईज नग १००, घ.मी.०.२९०३, माल किमंत रुपये १८०८२ इतका माल जप्त करण्यातआला व आॅटो किंमत ५० हजार असा एकूण  ६८ हजार ८२ रुपयांचा एवढा ऐवज जप्त केला. दरम्यान,आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
   तर, शनिवारी (दि.२५) रात्री  साडेअकराच्या सुमारास वनपरिक्षेत्र किनवट अंतर्गत नियतक्षेत्र चिखली(ता.किनवट) मधील कक्ष क्र. १९७ए सागी थूट ०३, घ.मी.०.५६७, किंमत १७ हजार ९३९, नग कट साईज १, घ.मी. ०.०४९९ माल किमंत  रुपये ३ हजार १०८ इतका माल जप्त करण्यातआला व आरोपी नामे शेख हसन शे.नजू यास पकडण्यात यश मिळाले, तर नामे शेख हैदर शे. रमजान ,शेख इम्रान शे. हुसेन हे फरार झाले आहेत. वरील सर्व आरोपी हे चिखली येथील रहिवासी आहेत
   ही कारवाई वनपरिक्षेञ अधिकारी खंदारे , वनपरिमंडळ अधिकारी के.जी. गायकवाड, ,संतवाले,शहाजी डोईफोडे, वनरक्षक संभाजी घोरबांड, अरुण चुकलवर, साईदास पवार,रवी दांडेगावकर,अनिल फोल्ले, मुळे, कापसे, घायाळ, वाहन चालक बी. व्ही. आवळे, बी. टी.भुतनर, दांडेगावकर वनमजूर भावसिंग जाधव यांचा सहभाग असलेल्या पथकाने पार पाडली.

No comments:

Post a Comment

Pages