नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार की आणखी वाढणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ३ मेनंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची सूचना केली. लॉकडाऊनमध्ये एकाएकी शिथिलता देता येणार नाही, याबाबतही या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहमती झाली. त्यामुळे आणखी किमान महिनाभर तरी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेड झोनमध्ये लॉकडाऊन अधिक कडक राहील, यलो झोनमध्ये काही सवलती दिल्या जातील तर ग्रीन झोनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणयाच्या अटीवर लॉकडाऊन पूर्णतः उठवला जाण्याची शक्यता आहे.
३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा, अशी सूचना मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आज चौथी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होती. परंतु वेळ नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे केवळ नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलण्याची संधी मिळाली
Monday 27 April 2020
लाॅकडाऊन आणखी एक महिना वाढणार?,मोदींकडे अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनचा आग्रह
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment