सध्या कोरोना या महारोगामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे सर्व विद्यापीठ व सलग्नित सर्व महाविद्यालय बंद असल्यामुळे या वर्षी होणाऱ्या उन्हाळी परीक्षा होणार की नाही किंवा झाल्या तर ऑनलाईन होणार का या संभ्रमामध्ये विद्यार्थी आहेत.
दि.25 एप्रिल 2020 रोजी फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील नरबाग व जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी स्वा. रा.ती.म.विद्यापीठ नांदेड चे मा. कुलगुरु डॉ. उद्धव भोसले सर व परीक्षा नियंत्रक डॉ. रवि सरोदे सर यांना व्हाट्सअप द्वारे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,आपल्या विद्यापीठातील सर्व संकुल व सलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी हे दुर्गम भागातील असून व काही विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्या कडे Android मोबाईल नाहीत व ज्यांच्या कडे आहेत त्यांना नेटवर्क चा प्रॉब्लम भासत आहे त्यामुळे मा. कुलगुरु महोदय आपण अश्या ऑनलाइन परिक्षेपासुन वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करावा व ऑनलाइन परीक्षा घेण्यात येऊ नये अशी मागणी फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील नरबाग व जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Sunday 26 April 2020
विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येऊ नये: फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment