लंगर साहिब गुरुद्वारा ; संत बाबा नरेंद्रसिंघ एवं संत बाबा बालविंदरसिंघ यांची कारसेवा,५० हजार लोकांना पुरवते जेवण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 April 2020

लंगर साहिब गुरुद्वारा ; संत बाबा नरेंद्रसिंघ एवं संत बाबा बालविंदरसिंघ यांची कारसेवा,५० हजार लोकांना पुरवते जेवण

लंगर साहिब गुरुद्वारा ; संत बाबा नरेंद्रसिंघ एवं संत बाबा बालविंदरसिंघ यांची कारसेवा,५० हजार लोकांना पुरवते जेवण

 नांदेड : कोरोना वायरस विरुद्ध सुरु असलेल्या   लढ्यात येथिल लंगर साहिब गुरुद्वाराने पुढाकार घेतला असून नांदेड शहरासह परिसरातील गरजवंताना  लंगरची सेवा (अन्नदान) दिली जात आहे. दररोज सरासरी ४० ते ५० हजार लोकांना या अन्न दानाचा लाभ मिळत आहे.

नांदेड शहरात सध्या कलम १४४ सुरु आहे. लॉक डाउन परिस्थितीत शहर बंद मध्ये नागरिकांना खाण्या पिण्याच्या वस्तूंसाठी लोकांची चांगलीच पंचायत होत आहे. लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जतेथार संत बाबा नरेंद्रसिंघ जी एवं संत बाबा बालविंदर सिंघ जी यांनी नेहमी प्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून लंगर तयार करून वाटप सुरु केले आहे.

गुरुद्वारा लंगर साहिब कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यानंतर सर्वतोपरी मदतीला धावून नांदेड करांची सेवा करत आले आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर आलेल्या संकटातून देश सहीसलामत बाहेर पडावा व जनता जनार्दनाचे कल्याण व्हावे यासाठी लंगर साहिब गुरुद्वारा मध्ये सहा अखंड पाठ करण्यात आले. लंगर साहिब गुरुद्वारा च्या महाराष्ट्र राज्यात नांदेड सह मनमाड, शहापूर, चांदवड, देगलूर, कारेगाव लोहा येथिल संस्थान च्या मार्फत अन्नदान लंगर वाटप करण्यात येत आहे. दररोज सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांना ही सेवा उपलब्ध होत आहे. नांदेड भूषण संत बाबा नरेंद्रसिंघ जी एवं संत बाबा बालविंदर सिंघ जी यांच्या अधिपत्याखाली मोठ्या प्रमाणात देशात कारसेवा सुरू असून या सेवेच्या माध्यमातून पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश मध्ये हि या राष्ट्रीय आपत्ती दरम्यान लंगर ची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. सुमारे १ ते दीड लाख लोकांपर्यंत कार सेवेची ही सेवा पोहचत आहे. नांदेड येथे नगीना घाट, नवीन कौठा, मालटेकडी,विष्णुपुरी, कारेगाव, खानापूर देगलूर, औंढा नागनाथ, मनमाड, शहापूर, चंदवड येथे तसेच नांदेड मधील गोवर्धन घाट, घर कुल श्री राम सेतु पूल, वज़ीराबाद पुलिस स्टेशन,वज़ीराबाद ,  वन विभाग ,  भोकर फाटा ,वसमत फाटा पुलिस,डावले कार्नर,.दूध डेरी वासरनी,असर्जन, कोठा म्हाडा, पुराना कोठा, साई बाबा कमान पुराना कोठा, .  श्रवस्तिक नगर,हैदराबाद हाईवे ,अर्धापूर बाय पास,इंदिरा नगर,तारोड नाका या ठिकाणी जेवण वाटप केले. भिकारी लोकांसाठी नवीन कौठा येथे बाबा दिप सिंघ गुरुद्वारा समोर लंगर वाटप केले जाते.

No comments:

Post a Comment

Pages