कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांचा मतदार संघाचा झंझावाती दौरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 26 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांचा मतदार संघाचा झंझावाती दौरा

हिंगोली. :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील संपूर्ण वसमत पासून किनवट माहूर पर्यंत मतदार संघाचा नुकताच दौरा करून आरोग्य केंद्राची पाहणी करून कोरोनाच्या लढाईत कार्य करणाऱ्याच्या कार्याचे कौतुक केले.
         खासदार हेमंत पाटील यांनी संपूर्ण मतदार संघात दौरा करताना एक बाब त्यांच्या निदर्शनास आली की जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये फोगिंग मशीन नाहीत त्यामुळे सर्व  मतदार संघात  आरोग्य केंद्राना फॉगिंग मशीन देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली. कळमनुरी,औंढा नागनाथ, वसमत  तालुक्यातील रेशन दुकान संदर्भातील तक्रारीबाबत मदत केंद्र स्थापन केले तसेच औंढा नागनाथ तहसील  कार्यालयात भेट देऊन  तहसीलदारांकडून रेशन चा आढावा घेतला.तसेच हदगाव येथील तहसील कार्यालयात धावती भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सुविधा आणि जनतेला देण्यात येणाऱ्या रेशनच्या व्यवस्थेबद्दल माहिती घेतली.वसमत औंढा नागनाथ उमरखेड महागाव येथील विलगिकरण कक्षास भेट दिली देऊन उपाययोजनांची पाहणी केली. तसेच हिंगोली येथे वृत्तपत्र वितरकाना  धान्य किट  हे वाटप करून कृतज्ञाता व्यक्त केली. तर गजराज बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित मदतीचा घास उपक्रमाची प्रशंसा केली.सेनगाव  नर्सी नामदेव कळमनुरी तालुक्यातील वरुड येथील आरोग्य केंद्र आणि कोरोना विलगिकरण कक्षाची पाहणी केली. सर्व जनतेपर्यंत पोहचत असताना सोशल मिडीयाच्या माध्यमातून सवांद साधला.तर कोरोनाच्या लढाईत जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करणाऱ्या पोलीस, पत्रकार, आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी , व सफाई कर्मचारी यांना खारीचा वाटा म्हणून द्राक्ष वाटप केले.व कार्यवार तैनात पोलीस बांधवाशी सवांद साधला.शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन इसापूर धरणातून मे महिण्यात दोन वेळा शेतीसाठी व शहरी भागात पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी यवतमाळ जिल्हयातील जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे . नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नव्याने स्थापण करण्यात  आलेल्या कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा करण्यामध्ये महत्वाची  भूमिका निभावली आहे .किनवट माहूर तालुक्यातील  आरोग्य  केंद्राना औषध फवारणी मशीन देण्याची मागणी केली.नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा मध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या हरियाणातील भाविकांची परत जाण्याची व्यवस्था केली.
      या कोरोनाच्या लढाईत शेतकरी राजाच्या  हित सुद्धा लक्षात घेतले पाहिजे यादृष्टीने नांदेड व  यवतमाळ  येथे खरीप हंगाम पूर्व बैठकीला उपस्थिती लावून किनवट येथे माती परीक्षण केंद्र मंजूर करून घेतली आणि  किनवट व हदगाव तालुक्यातील तामसा  येथे कापूस खरेदी केंद्र तर किनवट येथे मका खरेदी केंद्र स्थापन करण्याची मागणी केली.  व शेतकऱ्याला उत्कृष्ट बी-बियाणे देण्याची मागणी केली.महागाव येथील झोपडपट्टी वस्तीत 200 गरजूना धान्य किटचे वाटप खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages