जेष्ठ साहित्यिक व "झुलवा" कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 26 April 2020

जेष्ठ साहित्यिक व "झुलवा" कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक , प्रसिद्ध झुलवा  कादंबरीचे लेखक उत्तम बंडू तुपे यांचं आज (दि .26 एप्रिल 2020 ) वयाच्या ८९ वर्षी अल्पशा आजारानं  सकाळी  आठ  वाजता निधन झालं . त्यांना २२ एप्रिल २०२० रोजी जहांगीर हॉस्पिटल येथे त्यांना दाखल  केलं होतं.
   सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका छोट्या  खेड्यात तुपे यांचं दुष्काळामुळं पोट भरण शक्यच नव्हतं . त्यामुळं  दुष्काळी परिस्थितीला टाळण्यासाठी  ते पुण्यात आले. त्यांच्या  बहिणीच्या आधारानं सुरुवातीला काही दिवस  त्यांनी  पुण्यात घालवले . पुण्यात  त्यांना  अण्णा भाऊ साठे यांचं साहित्य वाचावयास मिळालं . अण्णाभाऊ यांच्या साहित्याचा मोठा प्रभाव त्यांच्याचवर पडला आणि त्यातून त्यांच्यामधले लेखन बीज अंकुरले.  आत्याच्या आश्रयानं ते पुण्यात कसेबसे जगले. पडेल ती कामं पत्करली. हातावरची मोल मजुरी करून दिवस काढले. झोपडपट्टीत या प्रतिभावंत लेखकाची  वाढ झाली . अनेकानेक कटु अनुभवांना सामोरे जात त्यांनी त्या अनुभवांना शब्दांचं कोंदण दिलं .

अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केलं आहे. कादंबरी, लघुकथा, नाटक आणि आत्मकथन आशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली . ‘काट्यावरची पोटं’ हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजलं . अत्यंत प्रामाणिकपानं  त्यांनी ते लिहिलं  आहे. उपेक्षित, वंचित समाजाच्या वेदना-व्यथा त्यात चित्रित झाल्या आहेत. त्या चित्रणात वास्तवता ओतप्रोत भरलेली  आहे .त्यात  सचोटीची अनुभूती आहे .  मातंग समाजाचं  दुःख  मांडलेलं  आहे; जीवन संघर्षाचे वर्णन त्यात आलं  आहे. या आत्मचरित्रात सामाजिक स्थितीचं  विदारक दर्शन घडलं असल्यानं आजवरच्या दलित आत्मकथनांत त्याचं  स्थान उच्च दर्जाचं आहे ,असं  म्हणता येईल.
 त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment

Pages