मंत्रालयात जायायचय,मास्क लावा ,अन्यथा प्रवेश नाही - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 April 2020

मंत्रालयात जायायचय,मास्क लावा ,अन्यथा प्रवेश नाही

मंत्रालयात जायायचय,मास्क लावा ,अन्यथा प्रवेश नाही


मुंबई: मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून या सूचनेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांनी पालन करून मंत्रालयात मास्क लावूनच प्रवेश करावा अन्यथा त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages