स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत गोकुंदा येथील रूग्णालयास रूग्णवाहिका खरेदीसाठी निधी मंजूर करा - आ. केराम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 3 April 2020

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत गोकुंदा येथील रूग्णालयास रूग्णवाहिका खरेदीसाठी निधी मंजूर करा - आ. केराम

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत गोकुंदा येथील रूग्णालयास रूग्णवाहिका खरेदीसाठी निधी मंजूर करा   - आ. केराम




 किनवट  : कोवीड -१९ च्या पार्श्वभुमीवर गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयास रूग्णवाहिकेची असलेली गरज लक्षात घेता स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत रूग्णवाहिका खरेदीसाठी निधी मंजूर करून तो तात्काळ उपलब्ध करून द्यावा ,अशी लेखी मागणी आमदार भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे केली आहे.
   Covid-19 या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत किनवट सारख्या अतिदुर्गम भागात या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास रूग्णांना तात्काळ जिल्हा रूग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी वेळेची गरज लक्षात घेता जलद रूग्णवाहिका असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच येथून जिल्हा मुख्यालयाचे अंतर तब्बल दिडशे किलोमीटर असल्याच्या  पार्श्वभुमिवर गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयास स्वत:ची रूग्णवाहिका असावी यासाठी आपातकालीन परिस्थिती लक्षात घेता स्थानिक विकास निधीअंतर्गत गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयास रूग्णवाहिका खरेदी करण्यासाठी निधी मंजूर करून मंजूर केलेला निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages