गावनिहाय वाटपापेक्षा शेतक-यांचे अनुदान थेट खात्यावर जमा करा - आ.केराम
*मध्यवर्ती बँकेच्या अजब कारभाराबाबत तहसीलदारांना सूचना*
*किनवट* : लॉकडाऊन व संचारबंदीच्या पार्श्वभुमिवर सामाजिक अंतराचे भान न बाळगता शेतकरी अनुदान शेतक-यांच्या थेट खात्यावर जमा करण्याऐवजी गावनिहाय वाटप करीत असल्याने सदरचे शेतकरी अनुदान गावनिहाय वाटप करून सोशल डिस्टेंसींगचे तिन तेरा वाजवण्यापेक्षा ते शेतक-यांच्या थेट खात्यावर जमा करण्याच्या अत्यंत तातडीच्या सूचना आमदार भीमराव केराम यांनी किनवट व माहूर तहसीलदारांना दिल्या आहेत.
किनवट व माहूर तालुक्यातील अतिवृष्टी व महामहीम राज्यपाल घोषित अनुदानाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जमा झाली आहे. सदरची रक्कम शेतक-यांच्या थेट खात्यावर जमा करणे क्रम:प्राप्त आहे. सोबतच लॉकडाऊन व संचारबंदीची परिस्थिती पाहता 'कोरोना' विषाणूची श्रुंखला तोडणे अत्यावश्यक बाब बनल्याने सामाजिक अंतर राखणेही तितकेच गरजेचे आहे. असे असताना किनवट व माहूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखेतून सदरची अनुदानाची रक्कम गावनिहाय वाटप सुरू आहे.
Thursday 16 April 2020
गावनिहाय वाटपापेक्षा शेतक-यांचे अनुदान थेट खात्यावर जमा करा - आ.केराम
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment