जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आकाशवाणीवरुन श्रोत्याशी साधणार संवाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 16 April 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आकाशवाणीवरुन श्रोत्याशी साधणार संवाद

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आकाशवाणीवरुन श्रोत्याशी साधणार संवाद



नांदेड दि. 16 :- उद्या शुक्रवार 17 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वा. नांदेड आकाशवाणी केंद्रवरुन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना, वैद्यकीय  सुविधा, कायदा सुव्यवस्था आणि इतर केलेल्या उपाययोजना, नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयीची  माहितीपर मुलाखत  प्रसारित होणार आहे.

नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, उमरखेड, बीड, लातूर या जिल्ह्यातील काही भागांमध्ये तसेच तेलंगणा या राज्याच्या सीमावर्ती भागातील काही भागांमध्ये ही मुलाखत नागरिकांना ऐकायला मिळणार आहे. सुमारे 40 लाख श्रोत्यांपर्यत आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम पोहोचत असून या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करीत असलेल्या कार्याची  माहिती देण्यासाठी आकाशवाणी नांदेड केंद्रवरुन संवाद साधणार आहेत. श्रोत्यांनी या संवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन  करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

Pages