नांदेड विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जमवलेल्या निधीतून ५० गरजूंना नांदेड रेल्वे स्थानकावर अन्नधान्याचे कीट्स वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 19 April 2020

नांदेड विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जमवलेल्या निधीतून ५० गरजूंना नांदेड रेल्वे स्थानकावर अन्नधान्याचे कीट्स वाटप

 नांदेड  विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जमवलेल्या निधीतून ५० गरजूंना नांदेड रेल्वे स्थानकावर अन्नधान्याचे कीट्स वाटप




सर्व देशावर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकट ओढवले आहे. आदरणीय पंतप्रधान साहेबांनी घोषित केल्या नुसार संपूर्ण देशात  लॉक डाऊन सुरु आहे. सर्व प्रवासी रेल्वे सेवा दिनांक ०३ मे २०२०  पर्यंत देशभर बंद आहेत.

परंतु त्याच वेळेस अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य, खते -बियाणे , कोळसा, भाजीपाला, दूध, इत्यादी जीवनावश्यक / अत्यावश्यक वस्तू घेऊन भारतीय रेल्वे मध्ये माल वाहतूक सेवा सुरु आहे. या करीता  सर्व रेल्वे स्थानकावरील आणि नियंत्रण कार्यालयातील कामकाज सुरळीत पणे सुरु ठेवण्याकरिता रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे.

प्रवासी रेल्वे सेवा बंद  असल्यामुळे विविध रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काही अंशी आर्थिक अडचण येत असेल या भावनेतून विविध रेल्वे स्थानकावर काम करून पोट भरणाऱ्या लोकांची अडचण लक्षात घेऊन  नांदेड रेल्वे  विभागात अशा लोकांची अन्नधान्यांची सोय करण्याचे श्री उपिंदर  सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक,  नांदेड   यांनी ठरवले आहे.  यामुळेच गेल्या दोन आठवड्यात नांदेड रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकावर अशा  गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले होते.

आज दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी सकाळी पुन्हा हुजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर श्री उपिंदर  सिंग  यांनी सफाई कर्मचारी ,  हमाल यांना अन्नधान्या च्या पाकीटांचे वाट्प  केले. या प्रसंगी  श्री जे. एस. चौहाण, डीव्हिजनल पर्सनल ओफीसर (समंन्वय), नांदेड आणि श्री विश्वनाथ फड,  सहायक पर्सनल ओफीसर, इतर अधीकारी आणि कर्मचारी  हे उपस्थित होते. आज नांदेड रेल्वे स्थानकावर अशा  ५०  गरजूंना अन्नधान्य पाकिटांचे वाटप करण्यात आले. या पाकीटात  गहू पीठ, तांदूळ, डाळ, तेल, साखर, इत्यादी वस्तू आहेत.  नांदेड  विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जमवलेल्या निधीतून हे अन्नधान्य वाटप करण्यात आले.

अशा प्रकारचे कार्य नांदेड रेल्वे विभागातील इतर रेल्वे स्थानकावर हि केले जात आहे, गरज पडल्यास रेल्वे प्रशासन अशा प्रकारचे  कार्य पुन्हा करेल असे श्री उपींदर सिंघ यांनी सांगीतले आहे.

No comments:

Post a Comment

Pages