नाशिक येथिल भीमवाडी येथील सहकारनगर मध्ये आग १०० ते १५० घरे जळून खाक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 25 April 2020

नाशिक येथिल भीमवाडी येथील सहकारनगर मध्ये आग १०० ते १५० घरे जळून खाक


नाशिक :
भीषण आगीत १०० ते १५० घरे जळून खाक, लॉकडाऊनमध्येच रहिवाशी झाले बेघर आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली परिसरातील भीमवाडी येथील सहकार नगरमध्ये आग लागल्याची घटना घडली. अतिशय दाट लोकवस्तीचा आहे.नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात असलेल्या भीमवाडी सहकार नगर परिसरातील झोपडपट्टीला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत जवळपास १००-१५० घरे जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच १५-२० अग्निशमन बंबांच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. येथील सर्व रहिवाशी बेघर झाले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था बी. डी. भालेकर मैदान येथे करण्यात आली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली परिसरातील भीमवाडी येथील सहकार नगरमध्ये आग लागल्याची घटना घडली. अतिशय दाट लोकवस्तीचा आणि अरुंद गल्लीबोळ असलेला हा परिसर असल्यामुळे काही क्षणात सहकार नगरमधील १०० ते १५० घरे आगीत जळून खाक झाली. घरातील जवळपास ७ पेक्षा अधिक सिलेंडर्सचा या आगीत स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ बाहेर पडत होते तर संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते.

No comments:

Post a Comment

Pages