घाटंजी : तालुक्यातील अतिशय लोकप्रिय बाबू, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त नायब तहसीलदार तसेच बुद्धीष्ठ सोशियल पेन्शनर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अशोक बाबू निमसरकर आणि त्यांची पत्नी सेवा निवृत्त मुख्याध्यापिका पौर्णिमा निमसरकर या दाम्पत्याकडून दि. २५ ला कोरोना मुळे अडचणीत आलेल्या ३०० नागरिकांसाठी एक दिवसाच्या जेवणाचे साहित्य उपलब्ध झाले आहे.
तयार केलेल्या जेवनाचे वाटप चारचाकी वाहनाद्वारे विविध वस्तीत जाऊन निराश्रित वृद्ध नागरिक, दिव्यांग, अनाथ, मनोरुग्न, परराज्यातील व परजिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले. आज जेवण देण्याचा ३१ वा दिवस असून विकासगंगा संस्था, संस्कृती संस्था, माऊली बहू संस्था व घाटंजी तालुका पत्रकार संघटना यांचे वतीने प्रत्यक्ष गरजू पर्यंत रोज जेवण पोहोचविल्या जात आहे.
यासाठी रणजित बोबडे, प्रशांत उगले, गणेश भोयर, सन्तोष अक्कलवार, महेंद्र देवतळे, विनोद गुज्जलवार, राज जाधव, मोनू दुगड़, प्रेमानंद हांडे, विलास निलावार, गजानन उत्तरवार, पवन गुंडावार, सागर भोयर, सुनील नगराळे हे जेवण बनवून नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घेत आहे.
No comments:
Post a Comment