डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल सकाळी 9 वाजता भन्ते विनयबोधिप्रिय यांच्या सोबत लाईव्ह साजरी करावी-स्वप्नील नरबाग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 April 2020

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल सकाळी 9 वाजता भन्ते विनयबोधिप्रिय यांच्या सोबत लाईव्ह साजरी करावी-स्वप्नील नरबाग


डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल सकाळी 9 वाजता भन्ते विनयबोधिप्रिय यांच्या सोबत लाईव्ह साजरी करावी-स्वप्नील नरबाग


नांदेेेड :

देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला, माणसाला स्वाभिमान शिकवला,
ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले,या आकाशात एकमेव चमकता तारा, प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती,  प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा, सामाजिक क्रांतीकारी, स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती. ज्या महामानवाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आश्या महापुरुषांची जयंती ही जिवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे आमच्या.
कारण की तो दिवस म्हणजे आपल्या मुक्तीदात्याचा जन्मदिवस,एका सूर्याचा जन्मदिवस,ज्ञानाच्या अथांग सागराचा जन्मदिवस,मानवमुक्तीच्या विचाराचा जन्मदिवस,आपल्या लाडक्या आवडत्या बा भीमाचा जन्मदिवस,
जर बा भीमा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्मले नसतेच तर,हा विचार ही डोक्यात आला तर काळजातुन ते डोक्यापर्यंत चर्रर्र आवाज येतो मन सुन्न होतं, होतं ना.?
 दरवर्षी आपण वर्षातून या दिवसाची वाट आतुरतेने पाहत असतो जणू हाच दिवस काय सर्वस्व आहे आपल्यासाठी. पण हाच दिवस सर्वांसाठी  वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. पण यावर्षी कोरोना नावाच्या वैश्विक संसर्गजन्य आजाराचे संकट हे आपल्या सर्व मानव जाती समोर उभे असताना आपण जयंती साजरी करायची की नाही?  करायची तर कश्या प्रकारे ? तर ही  जयंती आपण साजरी करूया घरातून, सर्वजण एकाच वेळी डाँ. बाबासाहेबांना अभिवादन करूयात व एक नवीन  प्रकारे अभिवादन करून जयंती साजरी करूया, आपले  आदरणीय भदंत विनायबोधिप्रिय व भिक्खू संघांनी आपल्या ला आव्हान केलय, आपण त्यांच्या आव्हानानुसार त्यांना प्रतिसाद देऊ व बाहेर न जाता, कुठे ही कोणत्या ही गोष्टी साठी गर्दी न करता, डाँ बाबासाहेबांच्या पुतळ्या ला जाऊनच अभिवादन करेल हा हट्ट न करता, 14 एप्रिल ला सकाळी 9 वाजता हार फुले असतील अथवा नसतील जे घरीच राहून घरातीलच असलेल्या सामुग्री चा वापर करुन आपणास डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावयाचे आहे.  विनयबोधिप्रिय व भिक्खू संघ हे फेसबुक व विविध चॅनेल वर लाईव्ह असतील त्यांच्या सोबत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण  आपल्या मुक्तीदात्याची जयंती साजरी करून एक नवीन प्रकारचा आदर्श समाजासमोर ठेऊया.!
मी व माझा सर्व मित्र परिवार याप्रकारे महामानवाची जयंती साजरी करनार आहोत
व समाजातील वैचारिक युवकांनी याचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन फुले शाहु आंबेडकर युवा मंच चे स्वप्नील नरबाग यांनी केले आहे .

No comments:

Post a Comment

Pages