कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 11 April 2020

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती


  नांदेड : आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा जिल्ह्यात एकही  रुग्ण पॉझिटीव्ह नसून जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती आहे. आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन आसणाऱ्याची नागरिकची संख्या 482 आहे .
यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण  केलेले नागरिक 110 असून सध्या अजून निरीक्षणाखाली असलेले  49 नागरिक आहेत, यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -7 नागरिक आहेत तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -426 अशी संख्या आहे,

आज तपासणीसाठी 17नमुने घेतले होते, आज पर्यंत एकुण192 नमुने तपासणी  झाली आहे. यापैकी 145 निगेटीव्ह  आले असून 42 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आलेले  आहेत जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 70624 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत,
असे आरोग्य विभाग, नांदेड मार्फत कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages