माहुर : येत्या गुरुवारी (दि.९) येणाऱ्या शब ए बारात साठी मुस्लिम धर्मियांनी घराबाहेर पडू नये, कब्रस्तान मध्ये जाऊन प्रार्थना करण्या ऐवजी घरूनच प्रार्थना करावी,तसेच शब ए बारात ची नमाज ही घरीच अदा करावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा अल्पसंख्यांक विचार मंच चे सचिव फिरोज हाजी कादर दोसानी यांनी केले आहे.
मानवतेच्या दृष्टिकोनातून व कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी माहूर शहरातील पाच मशिद सह तालुक्यातील वाई बाजार, गोंड वाडसा, टाकळी, वडसा, पडसा, गोकुळ,सायफळ येथील मशिद मध्ये सामूहिक नमाज पठण करण्यावर मशिद कमिटीतर्फे रोख लावण्यात आलेली आहे.याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.९) येणाऱ्या शब ए बारात हा सण सुद्धा मुस्लिम समाज घरात साजरा करून आप आपल्या घरीच नमाज अदा करतील.यापूर्वीही दोन शुक्रवार (जुमा )ची नमाज घरी बसूनच अदा केलेली आहे.तसेच शब ए मेराज सुद्धा घरातच साजरी करण्यात आलेली आहे. म्हणून शब ए बारात ला सुद्धा मुस्लिम बांधवांनी घरीच प्रार्थना करावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा अल्पसंख्यांक विचार मंच चे सचिव फिरोज हाजी कादर दोसानी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment