कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल नेटवक्रींगद्वारे जातीय, धार्मिक तेढ वरील आक्षेपार्ह मजकूर, चित्रफीत आदी, अवैध सीमकार्ड वापरावर मनाई आदेश जिल्ह्यात लागू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 April 2020

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल नेटवक्रींगद्वारे जातीय, धार्मिक तेढ वरील आक्षेपार्ह मजकूर, चित्रफीत आदी, अवैध सीमकार्ड वापरावर मनाई आदेश जिल्ह्यात लागू

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
सोशल नेटवक्रींगद्वारे जातीय, धार्मिक तेढ वरील आक्षेपार्ह मजकूर,
चित्रफीत आदी, अवैध सीमकार्ड वापरावर मनाई आदेश जिल्ह्यात लागू


 नांदेड : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत (सोशल मिडीया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवक्रींगद्वारे जातीय / धार्मिक तेढ वरील आक्षेपार्ह मजकूर, चित्रफीत इत्यादी तसेच अवैध सिमकार्ड वापरावर मनाई आदेश नांदेड जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात लागू केला आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे की, कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. या काळात काही समाज विघातक / गुन्हेगारी वृत्तीचे लोक दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे संदेश अथवा लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल अशा अफवा / कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या त्यांच्यावरील उपचार व त्यात बळी पडलेल्या रुग्णांची संख्या तसेच या विषाणुचा प्रादुर्भाव झालेला परिसर या संशयित कोरोना बाधित व्यक्ती याबाबत कोणतीही खातरजमा खात्री न करता माहिती, बातमी सोशल मिडिया, विविध प्रसारमाध्यमांमध्ये पसरवत आहेत. त्यामुळे समाजात अकारण भिती उत्पन्न होत असल्याचे जाणवत आहे.
अशा संदेश, अफवा व बातमीमध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता आहे. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने अशी उपाययोजना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 खालील तरतुदींच्या अनुषंगाने जनतेस उद्देशून काढणे आवश्यक असल्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन नांदेड जिल्ह्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 अन्वये रविवार 5 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2 ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
या आदेशात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जातीय वैमनस्य, धर्मीक तेढ, समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या अनाधिकृत, खोट्या बातम्या तसेच कोरोना संबंधी अंधश्रद्धा आणि निराधार माहिती कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह प्रसारीत करणार नाही.
सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही डिजीटल माध्यमांद्वारे दोन समाजात जातीय तेढ / धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपाई संदेश, साहित्य, चित्रफीत इत्यादी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह प्रसारित करणार नाही.
सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवक्रींग प्लॉटफॉर्मचे ग्रुप ॲडमीन हे आपल्या ग्रुप मधील कोणत्याही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफीत इत्यादी प्रसारणासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार राहतील.
अवैध, अनाधिकृत सिमकार्ड वापर व बाळगण्यावर पाबंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती अथवा समुह भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे तसेच इतर प्रचलित कायदयांतील तरतुदीनुसा शिक्षेस पात्र राहील.
सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवक्रींग प्लॉटफॉर्मचे ग्रुप ॲडमीन तसेच वैयक्तिकरित्या सोशल मिडीया वापरणारे व्यक्ती यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन हा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपनी इटनकर यांनी एकतर्फी काढला आहे.
याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे, सर्व शासकीय कार्यालय, सर्व पोलीस स्टेशन, सर्व सार्वजनिक ठिकाणच्या नोटीस बोर्डावर नागरिकांच्या सुविधेसाठी पोलीस विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
हा आदेशात 5 एप्रिल 2020 रोजी निर्गमीत करण्यात आला असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages