नांदेड_दि 29 नांदेडात जिल्ह्यात आज कोरोना रुग्णां संख्येत 5 ने भर पडली आहे. या संबंधीचा अहवाल शुक्रवार दि.29 मे रोजी वाढली आहे. यामध्ये दोन हिंगोलीचे दोन रुग्ण नांदेडमध्ये आढळले आहेत,त्यांच्यावर जीएमसीमध्ये उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी सकाळी 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 97 अहवाल निगेटिव्ह,2 अहवाल हे अनिर्णित आले ,तर 5 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आज सापडलेले पाच रुग्णांमध्ये मिलतनगर येथे 32 वर्षीय पुरुष,28 वर्षीय लोहरगल्लीमधील पुरुष,40 वर्षीय मुखेडमधील महिला,तर हिंगोली जिल्ह्यातील कसबे येथिल 38 व 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे व
या रुग्णांवर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णाची संख्या 143 इतकी झाली आहेत, कोरोनामधून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 90 इतकी झाली आहे. व 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर 47 रुग्णांवर नांदेड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू असून त्यातील दोन स्त्रिया वय वर्ष 52 व 55 यांची प्रकृती गंभीर आहे.
नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.
आज 5 पॉझिटिव रुग्णांची भर
2 हिंगोली जिल्ह्याच्या रुग्णांचा समावेश.
एकूण रुग्ण संख्या 143 वर.
आत्तापर्यंत 90 बरे होऊन घरी
2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
7 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
48 रुग्णांवर उपचार सुरू.
दोन महिला रुग्णांची प्रकृती चिंताजनक
दरम्यान जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Thursday, 28 May 2020
नांदेड आज 5 रुग्णांची भर हिंगोलीच्या 2 रुग्णांचा समावेश, एकूण आकडा 143 वर.
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment