
तिसरा लॉकडाऊन चा टप्पा संपत येत असताना. नागरिकांना घरी जाता यावे यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष मदत करू लागले. शासनासोबत प्रशासन सुद्धा कामाला लागले आणि पुणे मुंबई येथील नागरिक आप-आपल्या गावी पोहचू लागले.
नागरिक आप-आपल्या गावी जरूर पोहचू लागले. त्यासाठी त्यांची मेडिकल तपासणी सुद्धा गेली गेली. पण यांच्या क्वारंटाईन ची व्यवस्था कोणत्याही स्थानिक शासनाने किंवा प्रशासनाने केली नाही. नागरिक घरी पोहचतात आणि मनमानी पणे वावरतात. तुम्ही होमक्वारंटाईन करायला नक्की सांगितले. पण सांगत असताना हा विचार केलाय का ? ती गावे आहेत शहरे नाही. शहरात शेजारी कोण राहते माहित नसते. पण गावात पूर्ण गावाची खबर असते. एवढी जवळीकता यांच्यात असते. होमक्वारंटाईन करायला या कामगारांकडे 2-3 खोल्यांची घरे यात स्वतःला हे क्वारंटाईन कसे करू शकतील ? तुम्हला जर आम्हा नागरिकांवर एवढा भरोसा होताच तर मग तुम्ही सुरुवातीलाच जमावबंदी व लॉकडाऊन लागू करण्याची गरज का पडली. हे तुम्हाला समजत नाही का ?
या काही दिवसातील कोरोनाबाधितांचा आकडा पाहता एक बाब समोर येत आहे की, कोरोनाच्या प्रवासाला ग्रामीण भागाकडे सुरुवात झाली आहे. हा प्रवास विदेशातून आलेल्या नागरिकांप्रमाणेच तर ठरणार नाही ना ? असा प्रश्न मनाला सतावत आहे. विदेशातून आणलेल्या नागरिकांना क्वारंटाईन का केलं नाही, असा प्रश्न आपण विचारत होतो. त्यांच्या प्रमाणेच आता या पुण्या-मुंबईतून व ईतर शहरातून येणाऱ्यांना का क्वारंटाईन केलं जातं नाही ? असा प्रश्न निर्माण करण्यासोबतच त्यांच्या क्वारंटाइनची सोय करण्याचा दबाव स्थानिक शासन व प्रशासनावर आणावी लागेल. सोबतच खबरदारी सुद्धा आम्हाला घ्यावी लागणार आहे. सुरुवातीची राज्यशासनाची भूमिका होती. आता स्थानिकशासन व प्रशासनाची भूमिका आहे. ग्रामीण भागाला शहरे होण्यापासून वाचवायचे असेल तर आताच पाऊले उचला. जर तशी व्यवस्था करण्यात येत नसेल तर आजच #जिल्हाप्रशासनाकडे तक्रार करा. तुमच्या घरातील कोणीही असेल तरी सुद्धा या बाबीकडे लक्ष द्या दुर्लक्ष करू नका. अद्यापपर्यंत तुम्ही त्यांच्यापासून दूर होतेच ना. आता ते काही दिवस तुमच्यापासून दूर राहतील पण नजरेसमोर तर राहतील. शहरातून येणाऱ्या नागरिकांनी सुद्धा स्वतः स्थानिक शासन प्रशासनाकडून क्वारंटाईन च्या सोयींबद्दल खात्री करून घ्यावी. नसेल तर ती करण्यास सांगावी. आयुष्यभर साथ राहण्यासाठी 15 दिवस वेगळे राहील तर काहीही बिघडत नाही. पण मला काहीही झालं नाही म्हणून वावरलात तर मात्र #धोका वाढवण्यास व गावांना शहरात रूपांतरित करण्यास कारणीभूत ठरु.
शासन कोरोनासह जगायला सांगतेय मग कोरोनासह जगायची आमची नक्कीच तयारी आहे. पण त्यासाठी तुम्ही काय नियोजन केलंय ते आधी कळवा. आम्हाला आमचा जीव नक्कीच प्रिय आहे. पण जगण्यासाठी लागणाऱ्या बाबी जर मिळत नसतील तर कस जगायचं ? मग त्यासाठी आम्हाला कामावर जावंच लागणार. कामे करावीच लागणार मग या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची ? कोण घेणार आमच्या आयुष्याची काळजी ?
अशा अनेक नवीन प्रश्नांचा सामना आता आम्हाला करावा लागणार आहे. वैयक्तिक पातळीवरूनच देशाचा विचार असतो. प्रत्येक नागरिकांचे आरोग्यदायी व सुरक्षित जीवन असणे हा त्याचा हक्क आहे. मग तो हक्क आम्ही त्यांना देतोय का ? शासन प्रत्येक बाबीत आपल्याला मदत करत नाही. अशावेळी प्रत्येक बाबीत आम्हाला त्यांच्या सहकार्याने वाटचाल करावी लागणार आहे. या आपत्कालीन स्थितीत स्थानिक शासन व प्रशासन काहीही व्यवस्था करत नसेल तर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन ही कामे करावीच लागतील. स्थानिक शासन तुम्हाला स्वतःहून काहीही देणार नाही. ते तुम्हाला लुटणारच असते. त्यांना तुमच्या आरोग्याशी काहीही देणं-घेणं नसते. काही दिवसांपूर्वी जंतूंनाशकाची म्हणून क्लोरीन ची फवारणी करून मोकळे झाले. व त्याच्या नावावर बिले उचलून घरात टाकली. पन जेव्हा या चुकून जर या स्थानिक शासनाच्या कुटुंबातील व्यति बाधित सापडला तर यांचे धाबे दनानणार. तोपर्यंत यांना जाग येणार नाही.
गावे म्हणजे शहरे न्हवेत. तरी स्थानिक शासन एवढा हलगर्जीपणा का करतंय ? गावात प्रत्येक नागरिकांबद्दल आपुलकीची भावना असते म्हणतात. मग कुठं आहे तुमची आपुलकीची भावना. पोट भरून घेण्याचा धंदा बंद करा. मानवतेच्या भावनेनं नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करा. येणारा काळ पावसाळ्याचा आहे. या काळात अन्य साथी सुद्धा पसरतात मग अशा वेळी तुम्ही काय करणार आहात.
आताच काळजी घ्या. येणाऱ्या काळात विविध साथी पसरू शकतात मग अशा प्रसंगी येणाऱ्या अडचणी व हि कोरोनाची अडचण याबद्दल दक्ष राहून काम करा व गावाला शहरे होण्यापासून रोखा.
©️जी.संदीप (गोणार,नांदेड)
No comments:
Post a Comment