कोरोना पार्श्वभूमीवर प्रचंड उन्हात खा.हेमंत पाटील यांची शेतकऱ्यांशी हितगुज - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 11 May 2020

कोरोना पार्श्वभूमीवर प्रचंड उन्हात खा.हेमंत पाटील यांची शेतकऱ्यांशी हितगुज



 किनवट,दि.११ : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील बऱ्याच दिवसापासून किनवट (चिखलीफाटा) येथील कापूस खरेदी केंद्र बंद होते.खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने हे कापूस खरेदी केंद्र पुन्हा आज(ता.११) सकाळी  सुरु झाले.खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते व आ.भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल,तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या उपस्थित या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.तीन हजार दोन शे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. सर्व राज्यभरात लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी पण बंद करण्यात आली होती. त्याचा फटका शेतकऱ्याच्या रब्बी मधील पिकाला बसला आहे .शेकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कापूस घरात पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.
किनवट आणि माहूर भागातील तब्बल २० हजार क्विंटलच्या आसपास कापूस शिल्लक आहे.याबाबत शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली होती. यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील,ना.छगन भुजबळ,ना.रावसाहेब दानवे, यांच्याकडे पाठपुरावा करून सीसीआय चे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.त्या मागणीला यश आले असून किनवट येथे कापूस खरेदी केंद्र आज सोमवारी सुरू झाले आहे.या केंद्राच्या शुभारंभा साठी रख रखत्या उन्हात कोरोना च्या पार्श्वभूमीवर नांदेड वरून किनवट येथे दाखल झालेल्या खासदार हेमंत पाटलांचे शेतकऱ्यांकडून सर्वत्र कौतुक होत असून शेतकऱ्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले असता खासदार हेमंत पाटील यांनी "आम्ही जनतेचे सेवक, जनतेसाठी अहोरात्र झटण्याची माझी तयारी असून यापुढेही शेतकरी हिताचे कुठलेही प्रश्न मागे राहणार नाही", अशी ग्वाही त्यांनी दिली.या वेळी ग्रेडर प्रवीण फडवणीस, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, भाजपाचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार, कृऊबा चे सभापती अनिल कराळे पाटील,नगरसेवक व्यंकट नेमानीवार, व्यंकट भंडारे,अनिल तिरमनवार,मनोज तिरमनवार ,मारोती दिवसे पाटील यांच्यासह  तालुक्यातील भाजप व शिवसेनेचे  पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Pages