किनवटचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांची विनंतीवरून घनसांगवी येथे बदली,तर किनवटचे भूमिपुत्र उत्तम कागणे यांची किनवट येथे पदस्थापना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 26 May 2020

किनवटचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांची विनंतीवरून घनसांगवी येथे बदली,तर किनवटचे भूमिपुत्र उत्तम कागणे यांची किनवट येथे पदस्थापना


किनवट : किनवटचे कर्तव्यदक्ष   तहसीलदार नरेंद्र देशमुख यांची त्यांच्या विनंतीवरून घनसांगवी जिल्हा जालना येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या रिक्त जागी सध्या पाथरी येथे कार्यरत असलेले तहसीलदार व किनवटचे भूमिपुत्र उत्तम कागणे यांची पदस्थापना झाली आहे.

 नरेन्द्र देशमुख हे किनवट येथे 31 मे 2017 रोजी तहसीलदार म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ,विधानसभा ,लोकसभा ग्रामपंचायत अशा अनेक निवडणुकीमध्ये अगदी उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच किनवट मध्ये प्रशासन चालवत असतांना त्यांनी त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनामध्ये शिस्त निर्माण केली.
त्यांच्या रिक्त जागी किनवटचे भूमिपुत्र तसेच किनवट, माहूर, अहमदपूर येथे नायब तहसीलदार म्हणून उत्तम कार्य केलेले व सध्या पाथरी जिल्हा परभणी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले शिस्तप्रिय अधिकारी म्हणून नाव कमावलेले उत्तम कागणे यांची किनवटचे तहसीलदार म्हणून पदस्थापना झाली आहे.  त्यांच्याकडून किनवट वासियांच्या आशा  उंचावलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages