२२ मे पासून नवीन आदेश लागू होणार असून ते ३१ मे पर्यंत कायम राहतील. यानुसार महाराष्ट्रात काय चालू राहणार आणि काय बंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 19 May 2020

२२ मे पासून नवीन आदेश लागू होणार असून ते ३१ मे पर्यंत कायम राहतील. यानुसार महाराष्ट्रात काय चालू राहणार आणि काय बंद

मुंबई :
महाराष्ट्रात   लॉकडाउन 4.0 लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत.
 २२ मे पासून नवीन आदेश लागू होणार असून ते ३१ मे पर्यंत कायम राहतील.
यानुसार महाराष्ट्रात काय चालू राहणार आणि काय बंद




हे बंद राहणार

– ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार.

– आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार.

– शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, बंदच राहणार.

– सलून, स्पा सर्वच झोनमध्ये बंदच राहणार.

– टॅक्सी, रिक्षा रेड झोनमध्ये परवानगी नाही.

– रेड झोनमध्ये चार चाकी, दोन चाकी वाहनांना अत्यावश्यक असेल तरच परवानगी.

– रेड झोनमध्ये खासगी बांधकाम साईटसना परवानगी नाही.

– रेड झोनमध्ये खासगी कार्यालयांना परवानगी नाही.

– रेड झोनमध्ये शेती कामांना परवानगी नाही.



काय सुरु राहणार

– दारु दुकाने (रेड झोनमध्ये होम डिलिव्हरीला परवानगी), कंटेनमेंट झोनमध्ये बंद राहणार, अन्य झोनमध्ये सुरु राहणार.

– वैद्यकीय दवाखाने कंटेनमेंट झोन वगळता सर्वत्र सुरु राहणार.

– कंटेनमेंट झोन वगळता हॉटेलमधून होम डिलिव्हरीला परवानगी.

– कंटेनमेंट झोन वगळता आरटीओ कार्यालये सुरु राहणार

– ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये टॅक्सी, रिक्षामध्ये चालकासह दोनजण अशी तिघांना परवानगी.

– मालवाहतुकीला सर्वत्र परवानगी

– अन्य झोनमध्ये खासगी बांधकामसाइटसना परवानगी.

– रेड झोनमध्ये शहरी भागात एकलदुकानांना मर्यादीत परवानगी.

– अत्यावश्यक दुकानांना सर्वत्र परवानगी.



– ई-कॉमर्स सेवांना कंटेनमेंट झोन वगळता परवानगी.

– कंटेनमेंट झोन वगळता बँका, वित्तीय सेवा सुरु राहणार.

– कंटेनमेंट झोन वगळता कुरियर पोस्टला सेवा सुरु राहणार

No comments:

Post a Comment

Pages