नांदेड, दि. 4 :- नांदेड जिल्हयात तसेच इतर राज्यातील किंवा इतर जिल्हयातील नागरीक, विद्यार्थी नांदेड जिल्हयात कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्हयात अडकलेले आहेत, अशा नागरिकांना आप-आपल्या गावी जाण्यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी https://covid19.mhpolice.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या संकेतस्थळावर परीपुर्ण माहितीसह छायाचित्र व इतर आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करून माहिती नोंदणी केल्यानंतर आपणास ऑनलाइन टोकण क्रमांक प्राप्त होईल. हा ऑनलाईन टोकन क्रमांक त्याच संकेतस्थळावरून डाऊनलोड पास या ऑपशनवर आपला टोकण क्रमांक नोंदवून पासची प्रिंट काढुन घेता येईल.
या पास नोंदणीसाठी आपणास नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच आपण कंटेनमेंट झोन (containment zone) मधील व्यक्ती नसावेत, आपण जाणारे ठिकाण हे देखील कंटेनमेंट झोन (containment zone) मधील नसावे. अधिक माहितीसाठी 02462-235077 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच collectornanded1@gmail.com हा ई-मेल नांदेड जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
Monday 4 May 2020
Home
जिल्हा
लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यात अडकलेले नागरिकांना, विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाण्यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्ध
लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यात अडकलेले नागरिकांना, विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाण्यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्ध
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment