नांदेड,1 :- कोरोना विषाणु संदर्भात आज शुक्रवार 1 मे 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात 1 हजार 112 संशयितांची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण घेण्यात आलेले स्वँब 985 असून त्यापैकी 962 जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे तर 7 स्वँब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 5 जणांचा स्वँब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. चार जणांचा निष्कर्ष निघाला नाही. घेण्यात आलेले स्वँब 985 त्यापैकी 6 रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आहेत.
पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा (वय 64 वर्ष) पॉझीटिव्ह अहवाल हा बुधवार 22 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता सदर रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यांसारखे गंभीर आजार होते. रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे गुरुवार 30 एप्रिल रोजी झाला असून मृताचा दफनविधी हा आसरानगर कबरस्तान येथे पाच व्यक्तिंच्या उपस्थितीत ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आला. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले होत त्या सर्व व्यक्तींचे अहवाल पहिल्यांदा निगेटिव्ह आले आहेत. त्याप्रमाणे 51 निकटवर्तीय व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वँब घेण्यात आलेले असून त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला रुग्णाचा (वय वर्ष 51 ) पॉझीटिव्ह अहवाल हा 30 एप्रिल रोजी प्राप्त झाला. या रुग्णाची प्रकृती गंभीर होती. या रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे सदर रुग्णाचा मृत्यू गुरुवार 30 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे झाला.
नांदेड शहरातील अबचलनगर येथील एका रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार 26 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील 18 व्यक्तींचे स्वँब घेण्यात येवून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 व्यक्तींच्या स्वँब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.
श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे 2 वाहनचालक आणि त्यांचा एक मदतनीस यांचाही स्वँब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. सदर वाहन चालक आणि मदनीस हे गुरुवार 23 एप्रिल रोजी पंजाब येथे जाऊन मंगळवार 28 एप्रिल रोजी परत आले असता त्यांना नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्याच्या सिमेवरच अडवून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. या तीन व्यक्तींचे बुधवार 29 एप्रिल रोजी स्वँब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सद्यस्थितीत या रुग्णांवर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचार सुरु आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या सर्व कोरोना बाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000
Friday 1 May 2020
Home
जिल्हा
पिरबुऱ्हाणनगर, परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रुग्णांचा मृत्यू पॉझिटिव्ह चार रुग्णांची प्रकृती स्थीर, संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
पिरबुऱ्हाणनगर, परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रुग्णांचा मृत्यू पॉझिटिव्ह चार रुग्णांची प्रकृती स्थीर, संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment