माजी नगरसेवक शंकर अण्णा गाडगे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 30 May 2020

माजी नगरसेवक शंकर अण्णा गाडगे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन

नांदेड--आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते तथा नांदेड मनपाचे दोन वेळा नगरसेवक राहिलेले शंकर अण्णा गाडगे यांचे शनिवारी सकाळी 8 वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे.मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षाचे होते.
विजयनगर (यशवंत नगर)येथील रहिवाशी असलेले शंकर अण्णा गाडगे यांनाशनिवारी सकाळी छातीत वेदना होऊ लागल्याने त्यांना तात्काळ नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.शनिवारी  दिनांक 30 मे 2020 सांयकाळी 5 वाजता गोवर्धनघाट येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्वात  2 ,मुले 2 ,मुली 2 भाऊ 2बहिणी , सुना, जावई, नातू असा मोठा परिवार आहे.
शंकर अण्णा गाडगे हे विध्यार्थी दशेपासूनचआंबेडकरी  चळवळीत झोकून दिले होते.आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड याचे खास विश्वासु म्हणूनही ते परिचीत होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

No comments:

Post a Comment

Pages