' गोलपीठा ' : ढसाळपुरा आणि नामदेव - डॉ. श्रीधर पवार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 17 May 2020

' गोलपीठा ' : ढसाळपुरा आणि नामदेव - डॉ. श्रीधर पवार



या शतकाचा आरंभ किंबहुना या सहस्त्रकाच्या  आरंभीच, माझी नेमणूक एस. टि. डी. चिकित्सालयात झाली मी सदर चिकित्सालयाच्या सोबतच एड्स सेल संलग्न स्थानिक ' कम्युनिटी ' सोबत ही काम करेन व सम्बधित विषयावर संशोधन ही करेन अशी बहुआयामी ( काही अनौपचारिक ) कर्तव्ये पार पडायची आहेत याची मला जाणीव होती. पहिल्या च दिवशी सकाळी बरोबर नऊ वाजता पोहचायचे आहे हे लक्षात घेऊन च झपझप पावले टाकीत निघालो. आल्हाद होता  व खोलवर औत्सुक्य होते ' गोलपीठा ' चे, नामदेव चा गोलपीठा ज्याचा मला प्रथमच साक्षात्कार होणार होता. पण पुढची वर्षे न सहन करण्या सारखी , एका विराट यातने समोर मी कोलमडून गेलो. नामदेव चा गोलपीठा अस्ताव्यस्त झाला होता, हा काळ नव्या उन्मेश चे स्वागत करणारा निश्चितच न्हवता. मी नामदेव च्या गोलपीठा चा मागोवा घेऊ लागलो, नामदेव च्या भेटी ही घेतल्या, पण माझा जीव इथे रमत न्हवता. हरपलेल्या गोलपीठा ची पुनरभेट होणे न्हवते. गोलपीठा नवीन लोकां सह त्याच्या नूतन भाषेसह व नूतन यातनेसह,  माझ्या सामोरा अवतरला होता. नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा चे मुखपृष्ठ म्हणजे आमच्या चिकित्सालया चा केस पेपर होता. एका सकाळी ज वि व नामदेव आमच्या चिकित्सालयात येऊन एक केस पेपर घेतला त्यावर नामदेव नेच चित्र रेखाटले होते , तेच कविता संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीचे मुखपृष्ठ होते. ( ज. वि. पवार यांची मुलाखतीतुन ) व्हिनेरियल डीसीज क्लिनिक चा केसपेपर त्यावर अस्पष्ट चिकित्सकाने आपली क्लिनिकल नोंदी करण्यासाठी चे रकाने पण या औपचारिकतेला मागे सरीत त्यावर बोल्ड  रेखाटन, एक बाई आपल्या कडे पाठ करून आहे, तिच्या नाभीतून झाड उगवले आहे व त्याच्या फांदीवर डोलदार फुलांच्या उगवण्या ऐवजी मृत'स्कल', भीतीचे अंतिम रूप दर्शवणारी.

नामदेव ढसाळ यांच्या वयाच्या २३ व्या वर्षी गोलपीठा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला (१९७२) त्याला आता दोन वर्षांनी अर्धे शतक पूर्ण होईल. सदर कविता संग्रहास मराठीचे सुप्रसिद्ध नाटककार व थोर साहित्यिक विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना आहे. सदर प्रस्तावनेत , नामदेव याच्या काव्यविश्व अज्ञात असल्याचे विनम्रपणे ते मान्य करतात. त्यांच्या समोर प्रश्न होता, "... कविता मला आवडली आहे पण शब्दशः समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार?.." कारण त्यांच्या मते, "... पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबाने 'नो मेन्स लँड ' - निर्मनुष्य प्रदेश - जेथून सुरू होतो तेथून नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे मुंबईतील, ' गोलपीठा ' नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते..." तेंडुलकर यांनी कवितेतील २७ शब्द आपण प्रथमच ऐकले व त्याचा अर्थ मला माहित नाही या विधानाने, मराठी साहित्य विश्वात सत्वर खळबळ उडाली. नामदेव च्या कवितेने इतर प्रस्थापित साहित्य जगताचे वेगळ्या अर्थाने लक्ष वेधून घेतले व त्यांनी जाहीर करून टाकले, ' रशाळ नामदेव यांच्या ऐवजी ढसाळ नामदेव सुरू झाला..' तर त्या कवितेचे फक्त स्वागतच केले नाही तर , तरुणांना एक नूतन अनोखा कवितेचा नमुना मिळाला  असे मान्य झाले. नामदेव सोबतच कविता लिहिणाऱ्या कवींची  व नव्याने प्रसूत झालेल्या नूतन काव्य प्रकाराची दखल  २५ नोव्हेंबर १९७३च्या टाईम्स ऑफ इंडियाची विशेष पुरवणी  दिलीप पाडगावकर यांनी संपादित केली होती.  नामदेव ढसाळ यांचा " गोलपीठा "  चे स्थान हे टी.एस. इलियट यांच्या ' वेस्ट लँड ' या कविते समान असल्याचे कवी दिलीप चित्रे यांनी मत वेक्त केले होते, ते पुढे म्हणतात, हे श्रेष्ठत्व फक्त मराठी पुरते नसून बृहन भारतीय कवितेसाठीही आहे. जर्मनीच्या बर्लिनमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात ते सामील झाले, (२००१, जून) तेथे त्यांचा निवडक कवितांचा जर्मनी अनुवादित कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यावेळेसचे डॉ. गुंथर सॉन्थाइमर, लोथर लुत्झे आणि दिलीप चित्रे यांची बिएट्रिक्स फाईलिडरर यांनी काढलेली छायाचित्रे ही गाजली होती.  डॉ. सॉन्थाइमर हे हेडलबर्ग विद्यापीठात तुलनात्मक धर्माचे शिक्षण देणारे दिग्गज इंडोलॉजिस्ट होते. प्रोफेसर लुटे यांनी त्याच विद्यापीठात आधुनिक भारतीय साहित्य शिकवत आणि चित्रेसाठी जर्मनीचे दरवाजे खुले केले होते.
   नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर मराठी खेरीज इंग्लिश भाषेतील अनेक समीक्षकानी विशेष लेख लिहिले. एलेनोर झेलियट यांनी जयंत कर्वे यांच्या सोबत आत्ता ही कविता अनुवादित केली होती. नामदेव ढसाळ यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या तीन कवितांचे अनुवाद लॉरी होवेल आणि आशा मुंडल्ये यांनीं जयंत कर्वे यांच्या साहाय्याने केले. लॉरी होवेल यांनी " नामदेव ढसाळ : पोएट अँड पँथर " हे  बुलेटिन ऑफ एशियन स्कॉलर २३:२ ( १९९१) : ७७ -८३ या अंकात प्रकाशित केले होते. नामदेव ढसाळ मराठी परिघाबाहेर सर्वात चर्चित कवी आहेत,

No comments:

Post a Comment

Pages