नांदेड जिल्हात राष्ट्रवादी युवा जोडो अभियान राबविणार- स्वप्निल इंगळे पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 14 May 2025

नांदेड जिल्हात राष्ट्रवादी युवा जोडो अभियान राबविणार- स्वप्निल इंगळे पाटील


नांदेड प्रतिनिधी :

नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे येत्या रविवार १८ मे पासुन राष्ट्रवादी कांग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष ना.सुनील तटकरे साहेब , युवक प्रदेशाध्यक्ष  मा.सुरज दादा चव्हाण , कंधार लोहा मतदार संघाचे आमदार मा.प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शाखाली राष्ट्रवादी युवा जोडो अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इंजी स्वप्निल इंगळे पाटील यांनी दिली आहे.


          येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची ओळख आहे ना.अजितदादा यांनी अनेक युवकांना ग्रामपंचायत सद्यस पासून ते मंत्री पदापर्यंत संधी दिली आहे यामुळे युवकांची ओढ ही राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्व समाजातील व सर्व घटकातील युवकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे संघटन मजबुत करणार असे प्रतिपादन केले.


तसेच राष्ट्रवादी कांग्रेसची सद्यस नोंदणी ही कशी जास्तीत जास्त करण्यात येईल याची सुद्धा चर्चा सर्व जिल्ह्यातील युवकान सोबत करणार असे सांगीतले.


येणाऱ्या काळात मा.आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतुत्वात नांदेड जिल्ह्यातील युवकांच्या हाताला कसे काम देता येईल यासाठी रोजगार मेळावा सुद्धा आयोजित करण्यात येतील व राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे संघटन जिल्हात १ नंबर वर असेन असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.



No comments:

Post a Comment

Pages