तक्षशिला बुद्ध विहार येथे वैशाख पौर्णिमा साजरी व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 13 May 2025

तक्षशिला बुद्ध विहार येथे वैशाख पौर्णिमा साजरी व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न


किनवट :-

अखिल विश्वाला शांतिचा संदेश देणारे तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध यांच्या २,५८७ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौध्द महासभा,

गोकुंदा,किनवट शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी धम्ममंचावर अध्यक्ष म्हणून अभि.प्रशांत ठमके प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या शुभांगीताई ठमके,माजी प्राचार्य राजाराम वाघमारे, वाघमारे ताई,कयापाक सर उपस्थित होते.

 

दि.१२/०५/२०२५ रोजी बौद्ध अनुयायांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय  ते तक्षशिला बुद्ध विहार पर्यंत शुभ्र वस्त्र परिधान करून कॅंडल रॅली काढली होती याचे आयोजन प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी केले होते.


प्रारंभी पंचशिल ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नंतर दि.२४ ते २५ मे रोजी महात्मा ज्योतिबा फुले,विद्यालय येथे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन भारतीय बौध्द महासभा महिला शाखेच्या वतीने करण्यात आले होते. त्यातील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तक स्वरूपात बक्षिसे देण्यात आले.

राजाराम वाघमारे,प्रमोद मुनेश्वर,राजा तामगाडगे यांच्या कडून ही बक्षिसे देण्यात आली होती.


प्रा.वैशाली साबळे, आणि प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास माजी उपप्राचार्य एस.के.राऊत, पत्रकार दिलीप पाटील,प्रविण वाठोरे,सतिष विनकरे,सुबोध वाघमारे,प्रा.सुबोध सर्पे,प्रा.तुषार नरवाडे, शशिकांत नरवाडे तसेच परिसरातील अनेक बौद्ध उपासक-उपासिका,

बाल-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सीमा साळवे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages