किनवट :
माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट सारख्या डोंगरी आदीवासी भागातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाने यावर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.सेमि इंग्रजी माध्यमचा निकाल 99.36% टक्के लागला असून मराठी माध्यमाचा 87.65% टक्के निकाल लागला असुन गुणवत्तेत विद्यालयाने बाजी मारली आहे.
यादवकर ओमप्रसाद दिपक ह्यांने 97.80% गुणासह विद्यालयत सेमि माध्यमातून सर्वप्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला आहे तर कु.केंद्रे स्वाती बालकृष्ण 96.80 % गुणासह व्दितीय,कु.कऱ्हाळे ऐश्वर्या गोविंद हिने 96.00 % गुणांसह विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर मराठी माध्यमातुन कु.केंद्रे पायल बालाजी ही 88.00% गुणांसह प्रथम, कु.मुनेश्वर शिवाणी खंडु 87.00% गुणासह व्दितीय तर पल्हाडे रोशण रमेश ह्यांने 83.80.% गुणासह तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सेमी माध्यम गणित विषयात 100 पैकी 100 घेणारे विद्यार्थी
1) यादवकर ओमप्रकाश दीपक -100 2)प्रतिक ओंकार उमरे - 100
3)ऐश्वर्या गोविंद कराळे -100
दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या परीक्षेत मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडी व्दारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी घवघवीत यश संपादन केले आहे.इंग्रजी माध्यमातून एकूण 311 प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 309 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी 31, 75% पेक्षा जास्त गुण प्राप्त 139 विद्यार्थी 60% पेक्षा जास्त गुण प्राप्त 242 विद्यार्थी आहेत.
मराठी माध्यमातुन 170 प्रविष्ट होते पैकी 149 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 80% पेक्षा जास्त गुण प्राप्त 07 विद्यार्थी, 75% पेक्षा जास्त गुण प्राप्त 11 विद्यार्थी 60 % पेक्षा जास्त गुण प्राप्त 56 विद्यार्थी आहेत. विद्यालयाचा एकुण निकाल हा 95.22 % एवढा लागला.
विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत केलेल्या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक प्रमोद मुनेश्वर, उपप्राचार्य राधेश्याम जाधव,उपमुख्याध्यापक किशोर डांगे पर्यवेक्षक सुभाष सुर्यवंशी पर्यवेक्षक मनोज भोयर, पर्यवेक्षक संतोष बैसठाकुर, पर्यवेक्षक रघुनाथ इंगळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment