विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करण्यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे राज्यपालांना पत्र - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 15 May 2020

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करण्यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे राज्यपालांना पत्र


औरंगाबाद : जागतिक महामारी कोरोना मुळे जगभरात भयाची परिस्थिती निर्माण झाली आहे.यात अनुसूचित जाती जमातीच्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. अशात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने पुढाकार घेत थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवित सध्यस्थीतिची जाणीव करुन दिली आहे. या पत्रात नमूद केले कि आज घडीला राज्यातील सर्व विद्यापीठांचे परिक्षेत्र कोरोनाच्या प्रभावाखाली असल्याने कोरोनाचे संकट पूर्ण पने टळल्याशिवाय परीक्षा घेणे निव्वळ अशक्य आहे.तसेच नागरिकांची स्थिती आर्थिक दृष्या अत्यंत कमकुवत झाल्याने ग्रामीण भागातून शहराच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही केवळ परीक्षा देणेसाठी शहरात येणे,परीक्षा केंद्रावर जाणे,जेवण यासाठी आर्थिक तरतूद झाल्याशिवाय परीक्षा देणे शक्य नाही शिवाय मनामध्ये कोरोना विषाणूचे भय असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून मुकण्याची दाट शक्यता आहे.केवळ आर्थिक बाबी मुळे राज्यातील आर्थिक दुर्बल अनुसूचित जाती,जमाती च्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये त्यांचे शैक्षणिक व आर्थिक हित जोपासले जावे हे भारतीय राज्य घटनेतील कलम ४६ नुसार आपले कर्तव्य आहे.
यासाठी कोविड १९ कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यातील सर्व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मागील गुणाआधारे, व परीक्षेला पर्याय म्हणून होम असाइन्मेंट देऊन पुढील वर्गात प्रवेश देऊन उत्तीर्ण करणे गरजेचे आहे.आपल्या विचाराधीन असलेली अनलाईन परीक्षा अपुरी यंत्रणा,विद्यार्थ्यांचे अपुरे संगणक ज्ञान व ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता अशक्य आहे शिवाय केवळ औपचारीकता म्हणून परीक्षा घेण्यासाठी आग्रही असणे हे विद्यार्थ्यांच्या मुळावर उठण्यासारखे आहे.शिवाय सामाजिक अंतर ठेऊन परीक्षा घेण्यासाठी अजून किती वेळ वाट पाहावी लागेल हा केवळ प्रश्न आहे.राज्यातील सर्वच विद्यापीठाचा २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे.अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा देण्याची औचारिकता शिल्लक राहिलेली आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष लांबल्यास मोठे नुकसान होणार आहे.नवीन शैक्षणिक वर्ष लांबल्याने पुढील शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे कोलमडणार आहे ज्यामुळे विद्यार्थी संख्या रोडावणार आहे.कारण कोरोना च्या वाढत्या प्रभावामुळे आधीच आर्थिक – मानसिक दडपणाखाली आलेले विद्यार्थी शैक्षणिक वर्ष वाया जाईल की काय या मुळे भयभीत झाले आहेत.वयाची अट असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांची कोंडी होणार असल्याने त्यांचे शैक्षणिक हित जपण्याकरिता कलम ४६ प्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तरी परीक्षेबाबत ठोस दिलासादायक निर्णय घेण्यात येईल अशी आशा रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सचिन निकम यांनी व्यक्त केली.या निवेदनावर गुणरत्न सोनवणे
पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी,अॅड.पँथर अतुल कांबळे,प्रा.प्रबोधनबनसोडे,इंजि.अविनाश कांबळे,प्रवीण हिवराळे,सागर प्रधान,सागर शाह,स्वप्नील गायकवाड यांची नावे होती















































No comments:

Post a Comment

Pages