कथा एका अवलियाची ... - पवन भिसे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 17 May 2020

कथा एका अवलियाची ... - पवन भिसे



भंडारा जिल्ह्यामध्ये एक चिचाळ नावाचे छोटे गाव आहे .
त्या गावामध्ये 1970 साली एका मुलाचा जन्म झाला त्याची ही कथा ...

चिचाळ हे गाव खूप छोटं गाव , ते गाव महाराष्ट्राच्या नकाशात शोधाल तरी सापडणे कठीण असं छोटंसं गाव !!
गावामध्ये मोजकीच घरे , एकच प्राथमिक शाळा ..
त्या प्राथमिक शाळेचे शिक्षक रामजी , यांचा मुलगा अभ्यासात जेमतेम हुशार होता .
तो मोठा झाल्यावर एक मोठा डॉक्टर व्हावा हिच त्याचा आईची ईच्छा .
आता डॉक्टर का व्हावं ? तर गावामध्ये एक साधा दवाखाना नाही .
कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर अडीच किलोमीटर चालत जावे लागे . कितीतरी वेळा या मुलांना कडेवर घेऊन ती माय पावसापाण्याची अडीच किलोमीटरची पायपीट करून जात होती .
त्यामुळं आपल्या पोरानं डॉक्टर व्हावं आणि आपल्या लोकांची इथेच सेवा करावी अशी त्या माउलीची ईच्छा .
म्हणून लहानपणापासून तुझा दादा इंजिनिअर आणि तू डॉक्टर व्हायचं अशी शिकवण त्या मायमाउलीने दिली होती ...
प्राथमिक शिक्षण घेत असतांना एक गोष्ट पक्की ठरविली होती की आपण डॉक्टर व्हायचंच .
आणि त्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आहे . म बालपणापासूनच वाचनाची अभ्यासाची गोडी निर्माण झाली , वाचनाची इतकी आवड की गावाच्या जवळपास एक छोटीशी लायब्ररी होती , त्यात 300 ते 350 पुस्तके असतील पण ते प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यागोदरच या पठयाने पूर्ण वाचून ठेवले होते इतकी प्रचंड आवड होती वाचनाची ...
प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी सातारा सैनिक स्कुल मध्ये प्रवेश केला .
सातारा सैनिक स्कुल जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवणार ते स्कुल .
सैनिकी स्कुल असल्यामुळे जडणघडण झाली ती अगदी शिस्तबद्ध आणि काटेकोर .
सकाळी 5 वाजता उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व गोष्टी अगदी वेळच्या वेळीच . वेळेवर उठने , व्यायाम करणे , शाळेत येणे , वेळेवरच जेवण , वेळेवरच खेळायचं , वेळेवर अभ्यास आणि वेळेवर झोप , यामध्ये कोणताही बदल नाही . आणि वेळ चुकवली किंवा शिस्त मोडली तर शिक्षा सुद्धा सैनिकांना असतात तशाच व्हायच्या . *त्यामुळे शिस्त आणि आत्मविश्वास जो मनावर बिंबवला गेला तो याच साताऱ्याच्या सैनिकी शाळेमध्ये .
शाळा सैनिकी असल्यामुळे आणि कडक शिस्तीचे पालन करून , अभ्यासात गोडी होतीच आणि प्रचंड आत्मविश्वासही होता ,  ठरवलं की आपण पायलट व्हायचं .
पायलट होऊन सैनिकी विमान चालवायच आणि देशसेवा करायची .
आणि म पायलट होण्यासाठी जी तोड मेहनत केली . परीक्षा पास झाली पण उंची कमी असल्यामुळे पायलट होता आलं नाही .
सैनिकी शाळेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं .
आणि म ठरल्याप्रमाणे डॉक्टर व्हायचं तर होतच म्हणून नागपूरमध्ये mbbs ला ऍडमिशन घेतलं .
Mbbs चा अभ्यास करत असतांना जातीयता अनुभवायला मिळाली , आणि मुलगा डॉ . बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन चा सभासद होता , बालपणी आईकडून बाबासाहेबांचा संघर्ष आणि त्यांना आलेल्या अडचणी आईने सांगितल्या होत्या . त्यामुळे इथे त्याच्याबरोबर काय घडतंय आणि का घडतंय हे त्याला चांगलंच समजत होत . पण डॉक्टर तर व्हायचंच होत .
वडिलांसोबत मोठा भाऊ सुद्धा मेडिकल च शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतः शिक्षण आणि सोबत काम करून याच्यासाठी पैसे पाठवत असे .
शिक्षण पूर्ण करून डॉक्टर व्हायचच हे हि पक्क ठरलं . आणि सैनिकी शाळेमधून झालेले कणखर संस्कार ,त्या शाळेने मनाने आणि शरीराने शक्तिशाली बनवलं होत . आणि पाहता पाहता या मुलाने mbbs ची परीक्षा पास केली ...
आईच स्वप्न पूर्ण झालं एक मुलगा इंजिनिअर आणि दुसरा मुलगा डॉक्टर . अजून 2 भाऊ आणि एक बहीण यांची जबाबदारी आता या मुलावर हि आली होती .
ज्या प्रमाणे मोठ्या भावाने याला शिक्षणासाठी मदत केली , त्याप्रमाणे आपल्या छोट्या भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी यालाही मदत करणे गरजेचेच होते .
शिक्षण घेतांना आलेले अनुभव याला माहीतच होते .
त्यामुळे आपण या सिस्टीम चा भाग झालो पाहिजे , जी सिस्टीम बदल घडवू शकते . हि ईच्छा मनात आली होती .
आणि गोंदिया मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत असतांना घरी सांगितलं की मी काम सोडतोय .
सहाजिकच घरच्यांनी सहजासहजी परवानगी दिली नाही , तू काम सोडलं तर तुझ्या भावंडांच शिक्षण कसं होईल ???
आणि एवढी चांगली नोकरी का सोडतोस . तर घरी सांगितलं की मला IAS अधिकारी व्हायचंय .
म्हणजे त्यांना कळावं म्हणून मला कलेक्टर व्हायचंय .
असं त्या मुलानं घरी आणि मित्रांनापण सांगितलं .
मित्र तर सोप्या भाषेत म्हणाले तू काय स्वतःला खूप शहाणा समजतो का ??

नको ती गोष्ट कशाला करतोस . आहेस ना डॉक्टर , आणि एवढंच कलेक्टर व्हायचं असेल तर काम करून कलेक्टरची परीक्षा दे .
पण यांना सगळ्यांना सांगायच्या अगोदर या मुलाने  काम करता करता एकदा परीक्षा दिली होती , काम करून पास होता येत नाही अभ्यासाला वेळ मिळत नाही हे फक्त या मुलालाच माहित होत .
आणि त्यावेळी  रंगारी नावाच्या फेमिली डॉक्टर ने विश्वास दिला आणि सांगितलं की दे परीक्षा .
पैशाचं टेन्शन घेऊ नको , मी आहे तुझ्यासोबत .
रंगारी डॉक्टर दिवसभर च्या कमाई मधून रोज 100 रु या मुलाच्या शिक्षणासाठी बाजूला काढत . आणि महिन्याच्या शेवटी या मुलाला देत असे , त्यातून हा मुलगा आपल्या लहान भावाच्या शिक्षणासाठी , तर काही स्वतःच्या शिक्षणासाठी वापरत असे .
रंगारी डॉक्टर न चुकता पैसे पाठवत असे . शिक्षणासाठी पैसे कमी पडू नये म्हणून आईने तिच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या . आणि आता परीक्षा पास होणं हीच मोठी परीक्षा ह्या मुलावर आली .
मुलाची जिद्द चालू 8 तासापासून सुरु केलेला अभ्यास 18 तासांवर गेला .
परीक्षा झाली निकाल आला निकाल सर्वांचाच आई , बाबा , भाऊ , बहीण , मित्र , डॉक्टर रंगारी जणू परीक्षा या सर्वांची होती .
निकाल आला तो जिद्दी मुलगा भारतातील उच्च परीक्षा पास होऊन IAS झाला .
IAS डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे..

हर्षदीप कांबळे प्रशासकीय सेवेत रुजू...

हळूहळू घरची परिस्थिती सुधारत गेली .
मोठा भाऊ परदेशात काम करू लागला . लहान भाऊ बहीण वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योग करू लागले .
जिथे एक एक पैसा जोडून आपलं घर व्यवस्तीत बांधता आलं नाही बापाला , पण शिक्षणाची गरिबी कधी मुलांना होऊ दिली नाही .
सर्व मुलांना बाबासाहेबांचे तथागत बुद्धांचे विचार लहानपणीच आईने इतक्या कुशलतेने संगोपन केले की सर्व मोठं मोठ्या हुद्यावर पोहचून सुद्धा आपल्या परिस्थितीची जाण ठेवून होते . पंचशिलेचे आचरण त्यांच्या अंगवळणी बसले . 10 बाय 10 च्या छोट्याश्या घरात 7 व्यक्ती राहत होते तिथे एक छान बंगला या मुलांनी आई वडिलांना अर्पण केला . आणि आई वाडीलांच्या छत्रछायेखाली गुण्यागोविंदाने राहू लागले ...


आता हर्षदीप कांबळे IAS असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यात , वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांची प्रशासकीय सेवा देत होते .
त्या सेवेत रुजू झाल्यापासून त्यांना जितके ज्यास्त बाबासाहेबांच्या विचारांचे काम करता येईल , बुद्धांच्या विचारांचे काम करता येईल तितके ज्यास्त काम करण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला .
ज्यावेळी कांबळे सर दिल्ली मध्ये समाजकल्याण मंत्री चे खाजगी सचिव होते त्यावेळी त्यांनी sc , st च्या बांधवांसाठी  प्रिमॅट्रिक स्कॉलरशिप योजना तयार केली . त्याचा देशातील 50 लाख विद्यार्थाना लाभ घेता आला .
तसेच 26 अली रोड जिथे बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला तिथे  बाबासाहेबांचं इंटरनॅशनल स्मारक तयार करण्यासाठी समिती नेमली ...
ज्यावेळी सरांची औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये आयुक्त म्हणून नेमणूक झाली .
त्यावेळी त्यांनी औरंगाबाद शहराचा विकास तर केलाच .
परंतु सर्वप्रथम औरंगाबाद मध्ये आल्यावर *बाबासाहेबांनी तयार केलेल्या मिलिंद कॉलेज ला भेट दिली आणि 250 ते 300 एकर परिसरात सुसज्ज रस्ते आणि सुशोभिकारणाचे काम केले .
तसेच औरंगाबाद मधील विद्यार्थाना प्रेरणा मिळावी म्हणून सावित्रीमाई फुले गुणवत्ता विकास योजना राबविली ..
ज्यामध्ये रुपये 20 हजारांपासून ते रुपये 1 लाखांपर्यंत विद्यार्थाना स्कॉलरशिप देण्यात आली .
ज्यावेळी सरांची यवतमाळ मध्ये कलेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यावेळी सरांनी तिथे 11 एप्रिल ते 14 एप्रिल महात्मा फुले व डॉ . बाबासाहेबांची सयुंक्त जयंती साजरी करण्याबरोबर समतापर्व कार्यक्रम 2004 साली सुरु केला तो आजही चालू आहे ..
त्यानंतर सर fdi कमिशनर महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियुक्त झाले तेंव्हा सरांनी लाख रु खर्च असणारी स्टेन जी हार्ट च्या पेशन्ट साठी वापरतात ती काही 5 ते 10 हजारावर आणली .
तसेच मुंबई मध्ये प्रामाणिक , निष्ठावान तरुणांचा समूह निर्माण करून जगाला हेवा वाटावा अशी बाबासाहेबांची 125 वी आंतराष्ट्रीय जयंती bkc मैदानावर साजरी केली .
तसेच कल्याण शहरामध्ये आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आयोजित केली .
त्यानंतर भिमांजली , महाकरुणा दिन असे कार्यक्रम केले .
त्याचप्रमाणे विद्यार्थाना mpsc , upsc चे मोफत क्लासेस उपलब्द केले .
दरवर्षी गरजू विद्यार्थाना शालेय आणि महाविद्यालयीन पुस्तके देण्याचे काम सर करतात .
आणि नुकतीच सरांची नियुक्ती सूक्ष्म आणि लघु उद्योग विभाग आयुक्त म्हणून झाली .
आणि let us grow together.. म्हणत तरुणांना उद्योग क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तयारी सुरु केली ...

त्याचप्रमाणे अजूनही खूप योजना आहेत ज्या सरांनी निर्माण केल्या परंतु त्या माझ्या रिसर्च मध्ये आल्या नाहीत , एक महत्वाची योजना आठवते की *सरकारचे कोणतेही टेंडर मधील 5 टक्के टेंडर हे sc , st साठी रिजव्ह राहतील .

वेगवेगळ्या पदावर असतांना सरांनी त्यांच्या कामामध्ये कुठेही थोडासही दुर्लक्ष केले नाही .
आणि समाजासाठी जितके ज्यास्त करता येईल तितके करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे .
सर नेहमी म्हणतात .
DEVELOPMENT OF SELF & DEVELOPMENT OF SOCIETY...
हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे .
आपल्या समाजाचे प्रोटेक्शन करणे आणि प्रोजेक्शन करणे ही आपली जबाबदारी आहे .
त्यामुळे समाजाचे कोणतेही कार्यक्रम सर अगदी उच्च प्रतीचेच घेतात .
कारण त्यातून आपले प्रोजेक्शन होत असते .
इतर लोक आपल्यावर नजर ठेवूनच असतात . त्यांना काही बोलण्याचा चांसच मिळाला नाही पाहिजे असा कार्यक्रम असला पाहिजे .
आपण जसं दाखवु तसं मत समाज्याचा बाबतीत बनवतात त्यामुळे आपण आपले कार्यक्रम आपले वर्तन अधिकाधिक सुंदरच दाखवायचे ..
प्रशासन सेवेत असतांना सर कोणतेही कार्य विचारपूर्वकच करतात करतात कारण त्यांना माहित आहे जर इतर लोकं त्यांच्याबद्दल चांगला विचार करतील तर इतर लोक त्यांच्या समाज्याबद्दलही चांगलाच विचार करतील .
चळवळीला पुढे नेण्यासाठी टाईम , ट्रेजरी आणि टेलेन्ट या सर्व गोष्टी तन , मन आणि धनाने देणारा हा अवलिया ...
सरांचं एक साधं गणित आहे सर म्हणतात एक माणूस साधारण सुदृडपणे 60 वर्ष जगतो , त्यातले 20 ते 25 वर्ष झोपण्यात गेले , उरले किती 35 ते 40 वर्ष त्यात आपलं घरच्या जबाबदाऱ्या , इतर गोष्टी पहिल्या असता आपल्याकडे 10 वर्ष असतील जेमतेम .त्यामुळे बाबासाहेबांचा रथ पुढे नेण्यासाठी तरुणांची पुढची पिढी तयार करण्यासाठी सर नेहमी आग्रही असतात , नुसते आग्रहीच नाही तर त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन सर पुढची फळी तयार करण्याचेही काम सातत्याने करत असतात . त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण सरांबरोबर राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या माध्यमातून जोडला गेला आहे .
आपल्याकडे खूप कमी वेळ आहे , कुशल कम्म करण्यासाठी , चळवळीला पुढे नेण्यासाठी . त्यामुळे जितके ज्यास्त धम्मकार्य करता येईल , जितके ज्यास्त चळवळींला योगदान देता येईल , जितके ज्यास्त कुशल कम्म करता येईल तितके ज्यास्त करावे . कारण कुशल कम्म करणे हि एक संधी आहे , आणि हि संधी सर्वांना मिळत नाही . त्यामुळे ही संधी कधीच सोडायची नाही .
आणि आपल्याकडे कमी वेळ आहे , आणि हाच संदेश सर देतात आणि स्वतः सुध्दा याचेच अनुकरण करतात .
आणि हे सर्व कुशल कम्म करण्याची ऊर्जा कुठे मिळते तर दीक्षाभूमी ..
नागपूर ...
WE ARE BECAUSE HE WAS* ह्या कृतज्ञ भावनेने उत्साहाने बाबासाहेबाना अभिवादन करण्याची पद्धत सरांनी आम्हाला  शिकविली ...
असा हा अवलिया....


इथेच अल्पविराम घेतो .
भेटू पुन्हा...


आपलाच...
पवन भिसे .
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती .
कॉर्डिनेटर .
डोंबिवली....




























































































































































































































































































































No comments:

Post a Comment

Pages