खाजगी रुग्णालयातील 9 रुग्णांचे बिल भरून तरुणांनी समाजासमोर ठेवला नवा आदर्श - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 25 June 2020

खाजगी रुग्णालयातील 9 रुग्णांचे बिल भरून तरुणांनी समाजासमोर ठेवला नवा आदर्श

   पुणे दि 25 : सद्या संपूर्ण भारत देश कोरोनाच्या संकटात अडकलेला आहे. यात महाराष्ट्र तर जास्तच प्रभावात आहे. शासकीय रुग्णालय पुरेसे पडत नाहीत. अश्यात रुग्ण खाजगी रुग्णालयाकडे धाव घेत असतानाचे दिसून येत आहे. राज्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. पर्याय नसल्यामुळे ईलाज करण्यासाठी या रुग्णांना खाजगी रुग्णालयात आपला उपचार करून घ्यावा लागत आहे, खाजगी रुग्णालयातील उपचाराचे बिल भरणे सामान्य नागरिकांना अती अवघड होऊन बसतंय. याला गांभिर्याने घेत मुंबई, पुणे मधील नितीन पगारे (मुंबई) कवी सचिन डांगळे(नवी मुंबई) प्रतीक वाघ (मुंबई उपनगर) या तिन तरुणांनी पुढाकार घेऊन, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी वर्ग यांच्या मदतीने कालपर्यंत तब्बल ९ रुग्णांचे बिल भरून त्यांचा डिस्चार्ज मिळवून घेतला.

अश्या संकट काळात माणुसकी जपण्याचा, टिकवण्याचा आदर्श आजच्या पिढीने या तरुणांकडून घेणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

Pages