निवृत्त महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते सपत्निक सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 30 June 2020

निवृत्त महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते सपत्निक सत्कार

नांदेड  दि. 30 :- महसूल विभागातील तीन निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ आदिंची उपस्थित होते.

भोकर तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त अव्वल कारकून केवलसिंग धनू जाधव, देगलूर तहसील कार्यालयातील स्वेच्छा सेवानिवृत्त मंडळ अधिकारी रमाकांत गणपतराव जोशी, लोहा तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त शिपाई धोंडीबा विठ्ठल नाईनवाड यांनी त्यांच्या सेवा महसूल विभागात पूर्ण केल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

0000

No comments:

Post a Comment

Pages