किनवट, दि.१७ : कोरोना महामारीच्या संकटकाळात शासनाने अद्याप शैक्षणिक सत्र सुरू करण्यास परवानगी दिलेली नसतांनाही, काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू केले असून, त्यानिमित्ताने हजारो रुपयाची देणगी (डोनेशन) व वार्षिक शुल्क आकारल्या जात आहे. याविषयी पालकांनी नाराजी व्यक्त केली असून, अशा बिकटकाळात शैक्षणिक संस्थानी असे अमानवीय कृत्य करू नये, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन केले जाईल, अशी चेतावनी तालुकाअध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी दिली आहे.
संपूर्ण देशभरात २२ मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग वेगात पसरू लागल्याने, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला, परिक्षा रद्द करण्यात आल्यात. या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांनी गतवर्षीच्या शेवटच्या चार महिन्याचे शुल्क परत द्यायला हवे. शिवाय पुढील शैक्षणिक सत्र सुरूच झाल्यास, शासकीय व खाजगी शाळांनी डोनेशन, प्रवेश शुल्क माफ करून एक आदर्श निर्माण करावा. वर्षानुवर्षे खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या निमित्ताने लक्षावधी रुपये कमावले आहेत; अशा बिकट परिस्थितीत त्यांनी पालकांची साथ द्यायला हवी, अशी अपेक्षा राठोड यांनी व्यक्त केली. ज्या पालकांना मराठी व इंग्रजी माध्यमातील खाजगी शाळा,महाविद्यालयांनी प्रवेशशुल्क वा डोनेशनसाठी त्रास दिला, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही याबाबत पालकांचे समाधान करूत, असे आवाहनही प्रकाश राठोड यांनी केले आहे.
Wednesday, 17 June 2020
Home
तालुका
शाळा व महाविद्यालयांनी पालकांना प्रवेश शुल्क व देणगी साठी त्रास देऊ नये ;प्रकाश राठोड यांची मागणी
शाळा व महाविद्यालयांनी पालकांना प्रवेश शुल्क व देणगी साठी त्रास देऊ नये ;प्रकाश राठोड यांची मागणी
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment