राजश्री पाटील यांची विधान परिषदेत नियुक्ती करा ; नारायण कटकमवार यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 17 June 2020

राजश्री पाटील यांची विधान परिषदेत नियुक्ती करा ; नारायण कटकमवार यांची मागणी

किनवट,दि.१७ : मराठवाड्यातील महिला सक्षमीकरण व व युवक कल्याण चळवळीच्या शिवसेनेच्या झुंजार कार्यकर्त्या तसेच वुमन ट्रांसफार्मिंग  इंडिया पुरस्कार प्राप्त राजश्रीताई हेमंत पाटील यांना महिलांच्या हितासाठी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिवसेनेतर्फे विधान परिषद आमदार पदावर निवड करण्याची मागणी शिवसेना कार्यकर्ते तथा  सेवानिवृत्त वन अधिकारी नारायण कटकमवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व पर्यटनमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य  ठाकरे यांच्याकडे नुकतीच लेखी निवेदन देऊन केली आहे.
    राजश्रीताई हेमंत पाटील या मराठवाड्यातील शिवसेनेच्या जुन्या आणि धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. आदिवासी व मागास स्तरातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन महिलांच्या हिताची अनेक कामे केली. गोदावरी अर्बन सहकारी बँक  आणि शिवधारा महिला सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून राजश्री पाटील यांनी अनेक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावला आहे. इतकेच नव्हे तर नांदेड, हिंगोली, परभणी तसेच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील हजारो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी रोजगार उपलब्ध करून देत आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नीती आयोगाने राजश्री हेमंत पाटील यांना वूमन ट्रांसफार्मिंग  इंडिया या पुरस्काराने गौरविले आहे. याशिवाय निराधार महिलांचीही अनेक प्रश्न सौ. पाटील यांनी मार्गी लावले आहेत. मराठवाड्यातील मागास व दुर्गम भागात राहणारा  सुशिक्षित तरुण वर्ग उद्योजक म्हणूनपुढे  यावा यासाठी राजश्रीताई या सतत परिश्रम घेत आहेत.जागतिक संकटाच्या काळात महिला तसेच युवकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःचा विकास घडवावा यासाठी युवकांच्या समूहांना मार्गदर्शन करणे तसेच स्थानिकांना आर्थिक मदत देणे हा  राजश्रीताई यांचा सर्वश्रेष्ठ गुण असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. मराठवाड्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी,  युवकांच्या कल्याणासाठी राजश्रीताई हेमंत पाटील यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिवसेनेतर्फे विधान परिषद आमदार पदावर निवड करावी, अशी मागणी किनवट  येथील शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते तथा  सेवानिवृत्त वनाधिकारी नारायण कटकमवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages